संत तुकाराम गाथेचे मुळलेखक श्री संताजी जगनाडे महाराजांच्या ४०० व्या जयंतीनिमित्त ठाण्यात भव्य दिंडीचे आयोजन..

प्रतिनिधी-सुधीर राऊत
ठाणे :– संत तुकाराम गाथेचे मुळलेखक श्री संताजी जगनाडे महाराज यांची ४००वी जयंती ठाणे शहरात रविवार, ८ डिसेंबर २०२४ रोजी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सकाळी महानगर पालिका मुख्यालय, जिल्हाधिकारी कार्यायल, जिल्हा परिषद कार्यालय, तहशिलदार कार्यालय व जिल्हा सामान्य रुग्णालय आदी ठिकाणी तेली समाजाच्या ठाण्यातील विविध संस्थाद्वारे शासकिय जयंतीनिमित्त प्रतिमापुजन करण्यात आले.




सायंकाळी कोपरी, ठाणे पुर्व येथे ठाणे शहरातील तेली समाजाच्या सर्वात जुन्या श्री संताजी सहाय्यक संघ या संस्थेद्वारे भव्य दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. श्री संताजी महाराजांची प्रतिमा पालखीत ठेऊन संपुर्ण कोपरीगांवात दिंडी काढण्यात आली. याप्रसंगी ठाणे शहरातील तेली समाज बांधव मोठ्या प्रमाणात एकत्र आले होते.
संस्थेचे अध्यक्ष श्री. जयवंत रसाळ यांच्या नेतृत्वाखाली उपाध्यक्ष श्री. राजेश थोरात यांच्या संकल्पनेतुन या दिंडीचे यशस्वी आयेजन करण्यात आले. शिवसेनेचे स्थानिक नेते श्री. रमाकांतदादा पाटील यांच्या हस्ते श्री संताजी महाराजांच्या मुर्तीची पुजाअर्चा करुन दिंडीची सुरुवात करण्यात आली. यावेळी विविध पक्षांचे राजकिय नेते व सामाजिक संस्थांचे पदाधिकारी, तसेच शहरीतील इतर तेली समाजाच्या संस्थांचे पदाधिकारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संस्थेचे सहसचिव श्री. सुधीर राऊत यांनी केले.





ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com