दहिसरमध्ये भगवाधारीचा दहिकाला उत्सवाचे भव्य दिव्य आयोजन संपन्न..

0
Spread the love

प्रतिनिधी-अक्षय कांबळे

दहिसर:

दहिसर पूर्व या ठिकाणी भगवाधारी ग्रूप निकेश तळेकर यांनी दहीहंडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. दहीहंडी फोडण्याचा मान सन्मित्र दहीकाला पथक आणि बाबा लवर्स दहीकाला पथक जिंकले ६ लाख ६६ हजारांचे बक्षीस.

भगवाधारी ग्रूप निकेश तळेकर यांनी दिनांक ८ सप्टेंबर २०२३ रोजी भव्य दहीहंडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. आनंद नगर, दहिसर पूर्व भव्य प्रांगणात आकर्षक रक्कम
रुपये ६,६६, ६६६/- व भव्य चषक बक्षिसासह या दहीहंडी, स्पर्धेच्या आयोजन करण्यात आले होत. या स्पर्धेत गोरेगाव, मालाड, कांदिवली, बोरिवली दहिसर, मिरा रोड आणि विरार येथील तब्बल ७२ गोविंद पथकांनी नियोजनबद्ध, हर्षोल्हासात, जोशपूर्ण वातावरणात सहा / सात थरांचे मनोरे रचून दहीहंडी आणि उपस्थित प्रेक्षकांना सलामी देण्यात आली.

भारतीय जनता पार्टी दहिसर विधान मंडल आणि महाराष्ट्र विधान परिषद नेते श्री. प्रविणभाऊ दरेकर ,आमदार मनीषाताई चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकाश दरेकर नेतृत्वाखालील भगवाधारी उत्सव मंडळाचा आनंद नगर मेट्रो रेल्वेस्थानका जवळच लिंक रोड, दहिसर पूर्व, शिवमंदिरा समोर भव्य व्यासपीठावर सहा ते सात थराचा मनोरा लावलेल्या गोविंदा पथकांना रोख रक्कमेसह आकर्षक गौरव चिन्हासह सत्कार समारंभ स्थानिक आमदार मनीषाताई अशोक चौधरी,माजी नगरसेवक जगदीश ओझा जी,भाजप प्रभारी भक्ती सिंह ,दहिसर पोलीस ठाणे निरीक्षक राणी पुरी मॅडम इत्यादींचा सत्कार भगवाधारीचे प्रमुख निकेश तळेकर, यांच्या हस्ते सत्कार समारंभ करण्यात आला.

आनंद नगर मेट्रो रेल्वेस्थानक जवळच भगवाधारी उत्सव मंडळाचा स्तुत्य उपक्रम, गोविंद उत्सव, आपत्कालीन व्यवस्था आणि वाहतूक रहदारी व्यवस्था खूप छान होती. स्थानिकांकडून या गोविंद उत्सवाचे कौतुक समाधान सर्वत्र व्यक्त होते. यावेळी उपस्थित गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी व वाहतूक व्यवस्थेचे नियमन करण्यासाठी दहिसर पोलीस स्टेशनच्या वतीने विशेष सहकार्य करण्यात आले.

या शानदार दहिकाला उत्सव सूत्रसंचालन भरत उतेकर यांनी केले. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी बाळा चव्हाण, अभिजीत कदम, राज अंबोरे, अक्षय कदम, राकेश हसम, रोहित कदम, प्रविण धनुरे आणि नितेश भोसले यांनी विशेष परिश्रम घेतले.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट