स्वराज्य पोलीस मित्र,पत्रकार संरक्षण आणि माहिती अधिकार संघटने तर्फे भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन संपन्न..
उपसंपादक-रणजित मस्के
मुंबई:– जय स्वराज्य, स्वराज्य पोलीस मित्र, पत्रकार संरक्षण आणि माहिती अधिकार संघटनेचे राष्ट्रीय व संस्थापक अध्यक्ष श्री. दीपकजी कांबळे व मुख्य कार्यकारी महासचिव श्री. कमलेश शेवाळे (देवा) सर मुबई अध्यक्षा सौ सविता ताई तावरे यांच्या निर्देशानुसार,
भारत विकास परिषद पवई चांदिवली शाखा चे वतीने चंद्रभान कॉलेज पवई विहार कॉम्प्लेक्स येथे टाटा मेमोरियल ब्लड बँक चे सहकार्याने आज 4 फेब्रुवरी 2024 रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.


स्वराज्य पोलीस मित्र, पत्रकार संरक्षण आणि माहिती अधिकार संघटनेच्या वतीने भारत विकास परिषदेचे डॉ. अशोक म्हात्रे ह्यांचा वतीने श्री. सुरेश रेवणकर यांना निमंत्रण मिळाले, ह्या भव्य रक्तदान शिबिरास उपस्थित राहून रक्तदान शिबिरामध्ये रक्तदात्यांना मार्गदर्शन केले, ह्या कार्यक्रमाचे प्रमुख ह्यांनी समाज सेवक श्री. सुरेश रेवणकर यांच्या कार्याचे प्रशंसा केले व त्यांचा सन्मान केला. त्या दरम्यान त्यांचा रक्तदानाचे कार्याने प्रेरित होवून बऱ्याच एन एस एस चे विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी प्रथमच रक्तदान केले.


त्यांचे सन्मान श्री सुरेश रेवणकर यांच्या हस्ते केले त्याने प्रोसाहीत होउन इतर तरुण रक्तदाते रक्तदान करण्यास तयार झाले, जवळपास २०० च्या आसपास रक्तदात्यानी रक्तदान केले. हे सांगण्यास अतिशय आनंद होत आहे.
आपल्या स्वराज पोलीस मित्र पत्रकार संरक्षण आणि माहिती अधिकार कार संघटनेची माहिती व कार्य आणि रक्तदान अंगदान तसेच देहदानाची माहिती उपस्थित एन एस एस चे विद्यार्थ्यांना देहदानामुळे चार ते पाच लोकांना जीवनदान देता येते हे समजावून सांगितले. अशी माहिती
स्वराज्य पोलीस मित्र पत्रकार संरक्षण आणि माहिती अधिकार संघटना
मुंबई विभाग उपाध्यक्ष श्री
सुरेश प्रभाकर रेवणकर यांनी दिली.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com