घाटकोपर वृत्तपत्र विक्रेता संघ -सेनेतर्फे भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन संपन्न..

उपसंपादक-रणजित मस्के
घाटकोपर:– घाटकोपर वृत्तपत्र विक्रेता संघ – सेना व श्री.प्रकाश वाणी , दिपक गवळी, सचिन भांगे व सर्व पदाधिकारी मित्र मंडळी यांच्या वतीने 11 फेब्रुवारी, 2024 रोजी आपले पाहिले भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी समाजसेवक श्री. सुरेश रेवणकर यांना शिबिरास उपस्थित राहण्याचा मान मिळाला, शिवसेना नेते मा उद्योग मंत्री श्री.सुभाष देसाई शिवसेना नेते ह्यांनी रक्तदानाचे महत्व उपस्थितांना समजावून सांगितले, आणि रक्तदानाचे आवाहन केले.
त्यांना श्री रेवणकर यांनी 109 वेळा रक्तदान आणि 48 वेळा पांढरा पेशी चे दान असे एकूण 157 वेळा रक्तदान केल्याचे समजले आणि त्यांनी स्टेज वर बोलवून पाठ थोपटावून त्यांची प्रशंसा केले, तसेच शाल आणि श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देवून सन्मान केले, आणि त्यांचा अधिकाऱ्यांना त्यांचा वेब साईट वर त्यांचे रक्तदानाचे कार्य आणि माहिती टाकण्याचे सूचना केले.
असे जेष्ठ नेत्यांचे आशिर्वाद हेच आमचे यश आणि केलेल्या कार्याचे सार्थकी लागणे असे माझे मत श्री रेवणकर यांंनी सांगितले. आणि त्यांच्या सारखे रक्तदात्यांचे आदर्श बाळगावे मला जन्म देणारे आई वडील धन्य असल्याचे श्री रेवणकर यांनी उल्लेख केला.


ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com