ग्रामसुरक्षा यंत्रणेच्या तात्काळ व प्रभावी वापरामुळे डि.पी चोरीचा प्रयत्न फसला

सह संपादक – रणजित मस्के
फलटण ;
रविवार 23/03/2025 रोजी फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील काशीदवाडी ता.फलटण, जिल्हा_ सातारा गावात रात्री 2:47 वाजता गावात 3-4 चोर चोरीच्या उद्देशाने आलेले आहेत आणि कटरच्या साह्याने डी.पी कट करून खाली पाडलेला आहे आणि चोरून घेऊन जात आहेत,हे लक्षात येताच गावचे पोलीस पाटील श्री राहुल तंटक यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेता,तात्काळ ग्राम सुरक्षा यंत्रणेद्वारे (18002703600)सर्व गावाला व पोलीस स्टेशनला ही माहिती कळवली.
त्यामुळे तात्काळ गावकरी तसेच फलटण ग्रामीणचे पोलीस निरीक्षक श्री सुनील महाडिक साहेब यांच्या आदेशान्वये फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनचे PSI बदाने साहेब तसेच नाईट राउंडची गाडी घटनास्थळी दाखल झाले.संपूर्ण गाव सतर्क झाले आणि तात्काळ घटनास्थळी आले हे लक्षात येताच चोर डी पी जाग्यावर सोडून अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले व पुढील अनर्थ टळला.