शासकीय गोडावून मधुन गहू व तांदुळाची पोती चोरणारी टोळी अवघ्या १२ तासात सातारा एलसीबीच्या ताब्यात…

उपसंपादक – रणजित मस्के
सातारा :- श्री. समोर शेख पोलीस अधीक्षक सातारा व श्रीमती आँचल दलाल, अपर पोलीस अधीक्षक सातारा यांनी सातारा जिल्हयातील चोरी/ घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणणेबाबत पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांना सूचना दिलेल्या होत्या. त्या अनुषंगाने श्री. अरुण देवकर, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, सातारा यांनी पोलीस उप निरीक्षक श्री. पंतंग पाटील यांचे विशेष पथक तयार करून चोरी/ घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणणेबाबत आदेश दिले.
दिनांक १५/१२/२०२३ रोजी श्री. अरूण देवकर, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांना बातमीदारामार्फत बातमी प्राप्त झाली की, पोलीस अभिलेखावरील नागठाणे ता. जि. सातारा येथील गुन्हेगार याने त्याचे राहते झोपडीवजा घरात शासकीय गोडावूनची घरफोडी करुन त्यातील गहू व तांदळाची पोती चोरुन लपवून ठेवली आहेत, त्यानंतर श्री. अरुण देवकर, पोलीस निरीक्षक यांनी सदरबाबत श्री. पतंग पाटील व त्यांचे पथकास सदर ठिकाणी जावून कारवाई करणेबाबत सूचना दिल्या. त्यानुसार श्री. पतंग पाटील व त्यांचे पथकाने नागठाणे ता. जि. सातारा येथे जावून अभिलेखावरील गुन्हेगार जानवर शौकत भोसले याचा नागठाणे व परिसरात शोध घेतला असता तो राहते घरी मिळून आला नाही, गोपनीय बातमीदारामार्फत माहिती प्राप्त करुन त्यास एका शाळेचे मागिल बाजूकडून ताब्यात घेवून, त्यास विश्वासात घेवून त्याचेकडे अधिक चौकशी केली असता त्याने दिनांक १४/१२/२०२३ रोजी त्याचे ४ साथीदार यांचे मदतीने नागठाणे येथील शासकीय गोडावूनचे मुख्य शटरचे लगत असले खिडकीची जाळी व बार काढून आतमध्ये प्रवेश करुन ५० किलो वजनाची ६ पोती गहू व ५० किलो वजनाचे एक तांदळाचे पोते असा एकूण रुपये १५,०५०/- रु.चा मालाची चोरी करुन सदरचा मुध्देमला आपले राहते झोपडीवजा घरात लपवून ठेवला होता. सदरचे धान्य हस्तगत करण्यात आले असून त्याचे इतर ४ साथीदार यांना ताब्यात घेवून त्यास बोरगाव पोलीस ठाणे गुर.नं. ५७२/२०२३ भादविसक ४५४, ४५७, ३८० मध्ये बोरगाव पोलीस ठाण्याचे ताब्यात देण्यात आले आहे. अशा प्रकारे स्थानिक गुन्हे शाखेने गुन्हा दाखल होताच अवघ्या १२ तासाचे आत घरफोडी चोरीतील १००% माल हस्तगत करुन दमदार कारवाई केली आहे.

सदरची कारवाई ही श्री. समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा व श्रीमती आँचल दलाल, अपर पोलीस अधीक्षक सातारा, यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. अरूण देवकर, पोलीस उपनिरीक्षक श्री. पतंग पाटील, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक श्री.तानाजी माने, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक श्री. सुधीर बनकर, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विश्वनाथ संकपाळ पोलीस हवालदार मंगेश महाडीक, लक्ष्मण जगधने, मोहन नाचण, प्रविण कांबळे,, मोहसिन मोमीन, धिरज महाडीक संकेत निकम यांनी सहभाग घेतला असून कारवाईत सहभागी अधिकारी व अंमलदार यांचे श्री. समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा व श्रीमती आँचल दलाल अपर पोलीस अधीक्षक सातारा यांनी विशेष अभिनंदन केले,
आरोपींची नावे ..
१) जानवर शौकत भोसले, वय २३
२) शिवाजी शामराव मोहिते वय ३०
३) विनोद सिकंदर मोहिते वय ३८
४) वामन लिंबाजी माने वय ५३
५) हेमंत हणमंत साळुंखे वय ३३ सर्व रा. नागठाणे ता.जि. सातारा.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com