शासकिय कृषी कार्यालय फोडुन अंदाजे ५ लाखाचा मुद्देमाल लंपास करणाऱ्या आरोपीना कराड शहर डी.बी. पथकाने 24 तासाचे आत मुद्देमालासह केले अटक…

0
Spread the love

उपसंपादक – रणजित मस्के

सातारा :- मा. पोलीस अधीक्षक समीर शेख सो सातारा मा. अपर पोलीस अधीक्षक आंचल दलाल सो. सातारा, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी कराड विभाग कराड अमोल ठाकुर सो. व मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदिप सुर्यवंशी कराड शहर पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली कराड शहर पोलीस ठाणेचे गुन्हे प्रकाटीकरण पथक प्रमुख पोलीस उप निरीक्षक राज डांगे व डी. बी. पथकाने शासकिय कृषी कार्यालय फोडुन अंदाजे पाच लाखाचा मुद्देमाल लंपास करणाऱ्या आरोपीना कराड शहर डी. बी. पथकाने 24 तासाचे आत केले अटक संपुर्ण मुद्देमाल जप्त.

दिनांक २६/१२/२०२३ ते दिनांक २७/१२/२०२३ दरम्यान कृषी मंडल अधिकारी कार्यालय सैदापुर हे कार्यालय कोणीतरी अज्ञात चोरटयानी धारदार एक्साब्लेडने कुलुप कट करुन कार्यालयातील लॅपटॉप प्रिंटर व इतर कृषी साहित्य चोरी केले होते. सदर बाबत कृषी मंडल अधिकारी यांनी दिनांक २७/१२/२०२३ रोजी कराड शहर पोलीस ठाणेस गुन्हा तक्रार दिली होती. गुन्हा दाखल होताच पोलीस निरीक्षक प्रदीप सुर्यवंशी सो. यांचे आदेशाने डी.बो. अधिकारी राज डांगे व पथक तात्काळ गुन्हयाचे घटनास्थळी रवाना होत गुन्हयाचा तपास सुरु केला. गुन्हा करताना आरोपीने ज्या एक्साब्लेडने कार्यालयाचे कुलुप कट केले होते.

सदरचे ब्लेड हे घटनास्थळीच मिळुन आले, आणि तपासास दिशा मिळाली. सुतावरुन स्वर्ग गाठणे म्हणी प्रमाणे पोलीस उप निरीक्षक राज डांगे व पथकाने त्या एका एक्साब्लेडच्या आधारे नमुदचा गुन्हा करणाऱ्या आरोपी नामे अखिलेश सुरज नलवडे, आदर्श विनोद कोरे दोन्ही राहणार गजानन सोसायटी ओगलेवाडी ता. कराड जि. सातारा यांना ताब्यात घेतले असुन नमुद गुन्हयातील अंदाजे पाच लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन गुन्हयात वापरण्यात आलेली सुझुकी कंपनीची एक्सेस 125 मोटर सायकाल जप्त करण्यात आली आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास महिला पोलीस नाईक डुबल करीत आहेत.

सदरची कामगिरी मा. पोलीस अधीक्षक समीर शेख सो सातारा मा मा. अपर पोलीस अधीक्षक आंचल दलाल सो. सातारा, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी कराड विभाग कराड अमोल ठाकुर सो. व मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदिप सुर्यवंशी सो. कराड शहर पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक श्री राज डांगे सफौ, आर. देसाई, संजय देवकुळे, पोलीस हवा, शशिकांत काळे, पोलीस नाईक संतोष पाडळे, कुलदिप कोळी, पोलीस शिपाई महेश शिंदे, अमोल देशमुख, मुकेश मोरे, दिग्विजय सांडगे, वैभव पवार, सोनाली मोहिते, आनंदा जाधव, यांनी केलेली आहे.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट