शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी करणारा महसूल विभाग अत्यंत महत्वाचा विभाग-पालकमंत्री गणेश नाईक

0
Spread the love

उपसंपादक -मंगेश उईके

पालघर

1 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट महसूल सप्ताहाचा जिल्हाधिकारी कार्यालय येथे शुभारंभ

पालघर दिनांक 1 : महसूल विभागाचे कार्य हे जनतेच्या दैनंदिन जीवनाशी निगडीत असून, शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी करणारा महसूल विभाग हा अत्यंत महत्वाचा विभाग असल्याचे प्रतिपादन वनमंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी शुभेच्छा संदेशामध्ये केले.

1 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट या कालावधीत महसूल सप्ताहा 2025 चे आयोजन करण्यात आले असून महसूल सप्ताहाचा शुभारंभ जिल्हा नियोजन सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय येथे करण्यात आला.

यावेळी आदिवासी क्षेत्र आढावा समितीचे अध्यक्ष विवेक पंडित, आमदार राजेंद्र गावित, जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे,अतिरिक्त जिल्हाधिकारी भाऊसाहेब फटांगरे, निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष भागडे, उपजिल्हाधिकारी सर्वश्री महेश सागर, तेजस चव्हाण, विजया जाधव, रणजित देसाई,मुद्रांक जिल्हाधिकारी दीपक पाटील, तसेच वरिष्ठ अधिकारी आणि नागरिक उपस्थित होते.

आज १ ऑगस्ट. सर्वप्रथम मी पालघर जिल्ह्यातील सर्व नागरिकांना महसूल दिनाच्या व पालघर जिल्हा वर्धापन दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा देतो.
आपल्या पालघर जिल्ह्याची स्थापना दिनांक १ ऑगस्ट २०१४ रोजी झाली आणि आज या जिल्ह्याला ११ वर्षे पूर्ण होत आहेत. या ११ वर्षाच्या वाटचालीत अनेक आव्हानांना सामोरे जात, आपण सर्वांनी मिळून जिल्ह्याचा विकास साधला आहे आणि आपणा सर्वांच्या सहकार्याने पालघर जिल्ह्याची विकासाच्या दिशेने वाटचाल अशीच पुढे सुरु राहणार असल्याचा विश्वास पालकमंत्री गणेश नाईक यांनी व्यक्त केला.

आज महसूल दिन व महसूल सप्ताहानिमित्त महसूल विभागाच्या माध्यमातून जनतेच्या हिताचे, गरजांचे आणि न्यायाचे कार्य करणाऱ्या सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना या दिवसाच्या मी विशेष शुभेच्छा देतो.
आज दिनांक १ ऑगस्ट ते ७ ऑगस्ट २०२५ या कालावधीत ‘महसूल सप्ताह २०२५’ साजरा करण्यात येत असून या सप्ताहात जनतेच्या हिताचे अनेक उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्यात पुढील काही महत्त्वाच्या बाबींचा समावेश असलेल्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी सांगितले .

२०११ पूर्वीच्या शासकीय जमिनीवरील अतिक्रमणांचे नियमन, पाणंद व शिवार रस्त्यांची मोजणी आणि वृक्ष लागवड, छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाअंतर्गत वारस नोंद व फेरफार, विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना घरभेटी करून अनुदान वितरण, M-SAND धोरणाची प्रभावी अंमलबजावणी अशा विविध उपक्रमांसोबतच “शाळा तिथे दाखला” या आपल्या आदिवासीबहुल पालघर जिल्ह्यासाठी अतिशय महत्त्वाच्या उपक्रमांतर्गत, शालेय स्तरावर वि‌द्यार्थ्यांना दाखले वितरण, याअनुषंगाने पालघर जिल्ह्यातील ७१ हजार विद्यार्थ्यांना आवश्यक दाखले देण्यात येणार आहेत आणि आजच्या दिवशी ५९ लाभार्थ्यांना वनप‌ट्टे देखील वितरित करण्यात आले असल्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी सांगितले..
आपल्या जिल्ह्याला सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य, शेती व औ‌द्योगिक विकासाच्या दिशेने घेऊन जाण्याचा प्रयत्न करत असताना आपण सर्वांनी एकत्र येऊन प्रामाणिकपणे काम केले, तर निश्चितच पालघर जिल्हा महाराष्ट्रातील एक आदर्श जिल्हा ठरेल.

आज महसूल दिनाच्या निमित्ताने, महसूल विभागातील उत्कृष्ट काम करणाऱ्या गुणवंत अधिकारी व कर्मचारी यांचे मी मनःपूर्वक अभिनंदन करतो व अशाच पद्धतीने महसूल विभागाच्या माध्यमातून पालघर जिल्ह्यातील सर्वसामान्य माणसापर्यंत… जनतेची सेवा अविरतपणे घडत राहो अशी सदिच्छा शुभेच्छा पत्रामध्ये पालकमंत्री गणेश नाईक यांनी दिली .
महसूल विभागातील उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकारी कर्मचारी यांना प्रशस्तीपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले
महसूल सप्ताह शुभारंभ प्रसंगी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात आदिवासी क्षेत्र आढावा समितीचे अध्यक्ष विवेक पंडित, आमदार राजेंद्र गावित, जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे, अतिरिक्त जिल्हाधिकारी भाऊसाहेब फटांगरे, निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष भागडे, यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट