हद्दपारी आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या सराईत गुन्हेगार विरुद्ध गोरेगांव पोलीसांनी केला गुन्हा नोंद….

उपसंपादक-रणजित मस्के
गोंदिया : – याबाबत थोडक्यात माहिती अशी की, प्रतिबंधीत क्षेत्र, गोंदिया जिल्हयातून हद्दपार करण्यात आलेला सराईत गुन्हेगार इसम नामे- अक्षय गोंविद बावनकर, वय-32 वर्ष, रा- नोनीटोला याने उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी, तिरोडा यांचे हद्दपारी आदेशाचे उल्लंघन केल्या प्रकरणी त्याचेविरूद्ध कलम 142 (अ) मु. पो. का. 1951 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.
उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी, तिरोडा यांचे कार्यालयीन आदेश क्र- फौ. मा. क्र. 04/2023 मु.पो.का. 1951 कलम 56 (अ) पारित दिनांक- 08/12 /2023 अन्वये नोनीटोला येथील हद्दपार इसम नामे- अक्षय गोंविद बावनकर, वय-32 वर्ष याचेवर कलम 56 (अ) मु.पो.का. अन्वये कारवाई करण्यात आलेली असून नमूद इसम यांना दि.09/ 12 /2023 रोजी आदेश तामील करण्यात आले होते….आदेश तामील झाल्यापासून 02 महिन्यापर्यंत गोंदिया जिल्हयातून त्यास हद्दपार करण्यात आले होते…. तसेच नमूद.. हद्दपार इसम हा दिलेल्या आदेशाप्रमाणे प्रतिबंधीत क्षेत्र (गोंदिया) जिल्ह्यातून बाहेर गेला होता, ….नमूद आदेशाच्या अनुषंगाने हद्दपार इसम याने आदेश तामीलीच्या दिनांक पासून म्हणजेच दि 09/12/ 2023 पासून 02 महिनापर्यंत प्रतिबंधीत क्षेत्र गोंदिया जिल्हा सोडून जाणे व 02 महिना कालावधी पूर्ण होईपर्यत गोंदिया जिल्ह्यात प्रवेश न करणे अपेक्षीत आहे…
दि.12/01/ 2024 ला पो.नि. गोरेगाव यांचे आदेशानी पो.स्टे. गोरेगाव चे पोलीस स्टाफ पो.स्टे. परिसरात पकड वॉरंट मधील आरोपी शोध व पेट्रोलिंग करित असतांना तसेच नोनीटोला येथील नमूद हद्दपार इसम नामे- अक्षय गोंविद बावनकर, याचे पकड वारंट निघाले असल्याने गोरेगाव पोलीस पथक दि- 12/01 /2024 रोजी चे 08/00 वा त्यांचे घरी ग्राम नोनीटोला येथे गृहभेट करीता गेले असता तो घरी हजर मिळून आला.. त्यास उपविभागीय अधिकारी, तीरोडा यांचे आदेशाचे उल्लंघन करून इथे परत का आले म्हणून विचारणा केली असता, त्याने उपविभागीय अधिकारी यांचे आदेशांचे उल्लंघन केल्याबाबत काहीही ठोस कारण सांगितले नाही….
त्यामुळे हद्दपार इसम नामे- अक्षय गोंविद बावनकर, वय-32 वर्ष, रा- नोनीटोला याचे विरुध्द पो.स्टे. गोरेगाव येथे त्यानी उपविभागीय दंडाधिकारी, तिरोडा यांचे कलम 56 (अ) म.पो.का. 1950 च्या आदेशाचे उल्लघन करून विना परवाना प्रतिबंधीत क्षेत्र (गोंदिया जिल्हा) नोनीटोला येथे आपल्या घरी येवून राहत असल्याने त्याचे विरूद्ध पो.स्टे गोरेगाव येथे गुन्हा नोंद क्र. 27/2024 कलम-142 (अ) मु.पो.का. 1950 अन्वये कारवाई करण्यात आलेली आहे….
सदरची कारवाई मा. वरिष्ठांचे निर्देश सूचना प्रमाणे पोलीस निरीक्षक श्री. अजय भुसारी, यांचे मार्गदर्शनात स.फौं. खंडाते, पो.ना.कोल्हारे यांनी केली आहे..

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com