गोरेगाव पोलीसांची कारवाई :- अवैधरीत्या गोवांशिय जनावरांना निर्दयतेने कोंबून वाहतूक प्रकरणी 3 इसमांविरूध्द गुन्हा दाखल, 2 चारचाकी बोलेरो पीकअप वाहन, 11 गोवंश असा एकुण 4 लाख 55 हजार रुपयाचा मुददेमाल जप्त…

उपसंपादक-रणजित मस्के
गोंदिया:-🎯 याबाबत थोडक्यात माहिती अशी की, मध्यप्रदेश, छत्तीसगड राज्यात होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर गोंदिया जिल्हयातील सर्व पोलीस ठाणे हददीत अवैधरित्या धंदे करणा- यावर कारवाई करण्याचे तसेच सर्व अवैध धंदयाचे समुळ उच्चाटन करून अवैध धंद्यावर आळा घालण्याकरीता पोलीस अधिक्षक, श्री. निखील पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक श्री अशोक बनकर, यांनी सर्व ठाणेदार गोंदिया जिल्हा यांना जिल्ह्यातील अवैध धंदयावर धाडी टाकून प्रभावी कारवाया करण्याच्या निर्देश सूचना दिलेल्या आहेत ….
🎯 मा. वरिष्ठांचे निर्देश सूचना प्रमाणे व मार्गदर्शनाखाली पोलीस ठाणे गोरेगाव पोलीसांची अवैध धंदे करणाऱ्याविरूध्द धाड मोहीम राबविण्यात येत असून कारवाई करण्यात येत आहे… दिनांक- 15/ 11/2023 रोजी पो. ठाणे गोरेगाव पोलीसांनी डायल 112 वरुन मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे मौजा- ठाणा चौक, गोरेगाव येथे सायंकाळी 16.00 वाजता दरम्यान अवैधरित्या गोवंश जनावरें वाहतूक प्रकरणी कारवाई केली असता, बोलेरो पिक अप गाडी क्र.एम.एच. 35 के 4099 मध्ये 06 गोवंश जातीचे दोन लाल रंगाचे व 04 पांढऱ्या रंगाचे व बोलेरो पिकअप गाडी क्र. एम. एच. 40 ए.एफ. 6058 मध्ये 05 जनावरे असे एकुन 11 नग गोवंश जातीचे जनावरे किमती अंदाजे- 55,000 /- रु. दाटीवाटीने एकमेकाना बांधून, डांबुन ठेवलेली असल्याचे तसेच त्यांची कोणत्याच प्रकारचे चारापाण्याची सोय नसल्याचे दिसुन आल्याने जनावरें व दोन बोलेरो पीकअप वाहने असा एकुण किंमती 4 लाख 55 हजार /- रु. चा मुद्देमाल मिळुन आल्याने जप्त करण्यात आले……

आरोपी ईसम नामे –
1)संदेश एकनाथ फुल्लुके वय 41 वर्ष रा. मुरपार ता. सडक / अर्जुनी जि. गोंदिया
2) विकाश आनंदराव भोंडे वय 26 वर्ष रा. सातलवाडा ता. साकोली जि. भंडारा
3) आकाश संजय जगने वय 32 वर्ष रा. आमगांव जि. गोदिया
यांचेविरुध्द पो.ठाणे गोरेगाव येथे अप. क्र. 628/2023 कलम 11(1) (ड), 11(1), (ई), प्राण्यांना निर्दयतेने वागविण्यास प्रतीबंध कायदा 1960 सहकलम 6, 9 महा. पशु. संरक्षण अधि.अन्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला असून 11 गोवांशीय जनावरांना सुरक्षेच्या दृष्टीने त्यांचे चारा पाण्याची सोय व्हावी याकरिता गोशाला मध्ये दाखल करण्यात आले आहे....
सदरची कामगिरी पोलीस अधिक्षक, श्री. निखील पिंगळे, अपर पोलीस अधिक्षक, श्री. अशोक बनकर, उप- विभागिय पोलीस अधिकारी, आमगांव यांचे मार्गदर्शनात पो. ठाणे गोरेगाव येथील पो.नि. भुसारी यांचे पथक स.पो. नि. अमोल काळे, पोउपनि सुजित घोलप, स.फौज. यशवंत शहारे, पोहवा. अडमाची, लांजेवार, पोशि कुमडे, केवट, दास, खेकरे, यांनी केलेली आहे.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com