गोरेगाव हद्दीतील सराईत गुन्हेगारास 3 महिन्याच्या कालावधी करिता जिल्ह्यातून केले हद्दपार…

0
Spread the love

उपसंपादक-रणजित मस्के

गोंदिया :- पोलीस ठाणे गोरेगाव येथे विविध गुन्हे दाखल असलेल्या सराईत गुन्हेगाराला जिल्ह्यातून हद्दपार करण्यासाठी गोरेगाव पोलीसांनी केलेल्या कारवाईला यश आले असून उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी तिरोडा यांनी आदेश काढून सराईत गुन्हेगार नामे – हेतराम देवराम पटले वय 49 वर्षे राह . घुमर्रा, तालुका- गोरेगाव जिल्हा गोंदिया यास गोंदिया जिल्ह्यातून 3 महिन्यांच्या कालावधी करिता हद्दपार केले आहे.

गोरेगाव पोलीस ठाण्यांतर्गत ग्राम- घुमर्रा येथील रहिवासी सराईत गुन्हेगार ईसंम नामे- हेतराम देवराम पटले वय 49 वर्षे याच्याविरुद्ध गोरेगाव पोलीस ठाण्यात दारू पिऊन धिंगाणा घालणे, शिवीगाळ करणे, मारहाण करणे, जबरी चोरी करणे अशाप्रकारचे विविध कलामा अंतर्गत 9 गंभीर गुन्हे दाखल आहेत. गोरेगाव पोलीसांनी त्याचेवर वारंवार प्रतिबंधात्मक कारवाई करून सुद्धा त्याच्या चारित्र्यात आणि सवयीत कसलीही सुधारणा झाली नाही…उलट तो उर्मट, मगरूर व धाडसी प्रवृत्तीचा असल्याने परिसरातील लोकांच्या मनात दहशत निर्माण होऊन त्याच्या कृतीमुळे परिसरातील सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था धोक्यात आली होती. अशात गोरेगाव पोलीस निरीक्षकांनी ‘त्याला जिल्हा हद्दीतून हद्दपार करण्याकरिता महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 च्या कलम 56 (ब) अन्वये उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी, तिरोडा -पुजा गायकवाड, यांच्याकडे हद्दपार प्रस्ताव मंजुरीस्तव सादर केला होता…..उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी, तिरोडा- पुजा गायकवाड, यांच्या आदेशानुसार उपविभागीय पोलीस अधिकारी, आमगाव यांनी विहित मुदतीत सदर प्रस्तावाची प्राथमिक चौकशी पूर्ण करून नमूद सराईत गुन्हेगारास गोंदिया, भंडारा, नागपूर या जिल्हा हद्दीतून 2 वर्षा करीता हद्दपार करण्याची शिफारस केली होती… अखेर उपविभागीय दंडाधिकारी, तिरोडा पुजा गायकवाड यांनी 20 सप्टेंबर रोजी हद्दपारीचे आदेश काढून- हेतराम पटले याला तीन महिन्यांच्या कालावधी करिता जिल्ह्यातून हद्दपार केले आहे.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मा. श्री. गोरख भामरे, अपर पोलीस अधीक्षक श्री. नित्यानंद झा, यांचे निर्देशान्वये उपविभागीय पोलीस अधिकारी, आमगाव श्री. प्रमोद मडामे, यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक, श्री. भुसारी पो. ठाणे. गोरेगाव यांचे मार्गदर्शनात पोलीस अंमलदार पो.नायक लांजेवार यांनी केली असुन….स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. दिनेश लबडे, यांचे मार्गदर्शनात प्रतिबंधक सेलचे मपोउपनि. वनिता सायकर, पो.हवा. गायधने, तिवारी यांनी कार्यवाही पार पाडली…

हद्दपारीच्या कारवायांमुळे गुन्हेगारांत दहशत-

पोलीस अधीक्षक श्री. गोरख भामरे, यांनी रुजू झाल्यापासून त्यांनी गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यासाठी थेट हद्दपारीच्या कारवाया सुरू केलेल्या आहेत. यातूनच पो. ठाणे गोरेगाव पोलीसांनी सराईत गुन्हेगार – हेतराम पटले याचेवर हद्दपारीची कारवाई करून गोरेगाव परिसरातील नागरिकांना दिलासा मिळवून दिलेला आहे….पोलीसांकडून होत असलेल्या हद्दपारीच्या कारवायांमुळे गुन्हेगारांचे धाबे दणाणले असून परिसरातील जनतेने समाधान व्यक्त केले आहे..

गोंदिया जिल्हा पोलीस प्रशासनातर्फे पोलीस अधीक्षक गोंदिया मा. श्री. गोरख भामरे, यांनी जिल्ह्यातील सराईत गुन्हेगारांना ते करीत असलेल्या अवैध कृत्यापासून व अवैध धंद्यांपासून परावृत्त होऊन आपल्या चारित्र्य सुधारून इतर चांगले, वैध रोजगाराकडे वळण्याचे आवाहन केले आहे…. अन्यथा हद्दपारीच्या कारवाया सुरूच राहतील.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट