गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेसाठी प्रस्ताव सादर करावे..!

0
Spread the love

प्रतिनिधी-मंगेश उईके

पालघर:- दिनांक २९ (जिमाका) : शेती व्यवसास करताना होणाऱ्या अपघातामुळे शेतकऱ्यांचा मृत्यू ओढवतो किंवा काहींना अपंगत्व येते. अशा कुटुंबियांच्या वारसदारांना विमा संरक्षण देणारी राज्य शासनाची गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना विमा कंपन्यांमार्फत राबविण्यात येत आहे .

अंगावर वीज पडून मृत्यू येणे, नैसर्गिक आपत्ती, पूर, सर्पदंश, विंचूदंश, वाहन अपघात, रस्त्यावरील अपघात, विजेचा शॉक लागून मृत्यू अशा वेगवेगळ्या कारणांमुळे शेतकऱ्याला अपंगत्व किंवा मृत्यू ओढवला जातो. जर शेतकऱ्याचा अपघाती मृत्यू झाला अथवा शेतकऱ्याला दोन डोळे किंवा दोन अवयव गमवावे लागले, तर त्यांना २ लाख रुपयांची नुकसान भरपाई मिळते . अपघातामध्ये शेतकऱ्याचा एक अवयव किंवा एक डोळा निकामी झाला असेल, तर त्यांना १ लाख नुकसान भरपाई दिली जाते. योजना अंमलबजावणीसाठी विमा कंपनी कार्यरत नसताना योजनेमध्ये खंड निर्माण झाल्यास या कालावधीतील अपघातग्रस्त शेतकरी योजनेच्या लाभापासून वंचित राहू नये यासाठी हा कालावधी खंडित कालावधी म्हणून जाहीर करण्यात येतो.

१० डिसेंबर २०२० ते ६ एप्रिल २०२१,७ एप्रिल २०२२ ते २२ ऑगस्ट २०२२ व २३ ऑगस्ट २०२२ ते १८ एप्रिल २०२३ या खंडित कालावधीतील प्रस्ताव १५ ऑगस्ट पर्यंत सादर करावा. असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, निलेश भागेश्वर यांनी केले आहे.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट