गुगल रेटिंगच्या ऑनलाईन फसवणुकीतील २ , ७२,५०० /- परत करण्यास उत्तन सागरी पोलीसांना मोठे यश..

0
WhatsApp-Image-2024-05-22-at-1.22.45-PM
Spread the love

प्रतिनिधी- अक्षय कांबळे

भाईंदर-गुगल रेटींगचे ऑनलाईन टास्क पूर्ण केल्यास जास्त परतावा देण्याचे आमिष दाखवून ऑनलाईन गुंतवणुक करण्यास सांगुन केलेल्या फसवणुकीतील १०० टक्के रक्कम २,७२,५००/- रूपये तक्रारदार यांना परत करण्यात उत्तन सागरी पोलीस स्टेशन यांना यश आले आहे.

मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयाचे आस्थापनेवरील उत्तन सागरी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये राहणारे अक्सा सुलतान काझी, वय २१ वर्षे, व्यवसाय नोकरी रा.२०३, प्रिझम – ४, धावगी रोड, उत्तन, भाईंदर (प.), ता. जि. ठाणे या पार्टटाईम जॉबसाठी टेलीग्रामवर SAXENA या नावाचे व्यक्तीसोबत चॅटींग करीत असताना त्या व्यक्तीने पाठविलेले टेलीग्रामवरील ckcoincdcx.com या लिंकवर गुगल रेटींगचे टास्क देवून त्याबदल्यात मोठा परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवून पैसे गुंतवणुक करण्यास सांगुन त्यांची रू.२,७२,५००/- रूपये रकमेची फसवणुक झाली होती. सदर फसवणुकीच्या अनुषंगाने पो.स्टे. उत्तन सागरी येथे गुन्हा रजि नं. I १३१ / २०२३ भा.दं.वि.सं. कलम ४२०, ३४ सह माहिती तंत्रज्ञान (सुधारणा) अधिनियम – २००८ कलम ६६ (सी), ६६ (डी) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. सदर गुन्हयात एकापेक्षा जास्त पिडीत आहेत.

सदर गुन्हयाचा तपास करीत असतांना आरोपींनी फिर्यादी / पिडीत यांची रक्कम स्विकारण्यासाठी तसेच ती रक्कम वेगवेगळया बँक अकाउंटमध्ये वळती करण्यासाठी वापर केलेले अनेक बँक अकाउंट निष्पन्न झालेले होते. त्यामुळे तक्रारदार यांचे पैसे परत मिळविण्याकरिता सदरच्या बँक अकाउंटमधील रक्कम गोठविण्यात आलेली होती. त्यानंतर मा. न्यायालयाकडून तक्रारदार यांची रक्कम परत मिळविण्याकरिता उत्तन सागरी पोलीस ठाणेचे अधिकारी/अंमलदार यांनी वेळोवेळी पाठपुरावा केल्याने तक्रारदार अक्सा सुलतान काझी यांची फसवणुक झालेली रू. २,७२,५००/- ही रक्कम त्यांच्या बँक खात्यावर परत मिळविण्यात आलेली आहे.

अशा प्रकारची ऑनलाईन फसवणुक टाळण्यासाठी घ्यावयाची काळजी…

> Telegram Channel, Facebook, Instagram अथवा WhatsApp वर जास्त परतावा देणाऱ्या Promotional Adds वर विश्वास ठेवु नका. याव्दारे आपली फसवणुक होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

> अशा प्रकारच्या फसवणुकीमध्ये Telegram Channel, WhatsApp Group वर Adds करून तेथे इतरांना कसा फायदा होत आहे याचे Screenshots, Messages दाखवून पैसे गुंतवणुक करण्यास प्रवृत्त केले जाते. गुंतवणुकदारांचा विश्वास संपादन करण्यासाठी काही लोकांचे बँक स्टेटमेंटमध्ये त्यांना फायदा झालेची रक्कम दाखवून फसवणुक करण्यात येते. एकदा गुंतवणुकदारांचा विश्वास जिंकला की, हे लोक गुंतवणुकदारांना जास्त व खात्रीशीर परताव्याची हमी देतात. अशा गुंतवणुकीमध्ये आर्थिक फसवणुक होण्याचा धोका मोठया प्रमाणात असतो.

Work From Home नावाखाली Online Youtube Videi Link Task, Hotel / Movie Rating या सारख्या गुंतवणुक करणाऱ्या फसव्या जाहीरातींना बळी पडु नये.

जास्त परतावा देण्याचे आमिष दाखविणाऱ्या कोणत्याही ट्रेडींग अॅपवर विश्वास ठेवू नये तथा ट्रेडींग अॅपची विश्वासार्हता तपासून पाहीलेशिवाय गुंतवणुक करू नये.

कोणतेही अनधिकृत अॅप्लीकेशन डाउनलोड करू नये अथवा अनोळखी लिंकवर क्लिक करू नये.

ऑनलाईन फसवणुक झाल्यास तात्काळ आपले बँकेला संपर्क करावा.
मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयामधील नागरीकांना आवाहन करण्यात येते की, आपणांसोबत कोणत्याही प्रकारची ऑनलाईन फसवणुक झाल्यास आपण नजीकच्या पोलीस ठाणेस, सायबर पोलीस स्टेशन यांना संपर्क करावा. तसेच www.cybercrime.gov.in अथवा 1930 या हेल्पलाईनवर संपर्क साधुन तात्काळ आपली तक्रार नोंद करावी.
सदरची कामगिरी श्री. प्रकाश गायकवाड, पोलीस उप आयुक्त, परि.क्र.०१ मिरारोड, श्रीमती. दीपाली खन्ना, सहा.पोलीस आयुक्त, भाईंदर विभाग यांचे मार्गदर्शनाखाली पो.स्टे. उत्तन सागरीचे व.पो.नि. श्री. दादाराम करांडे, तपासी अधिकारी पो. नि. (गुन्हे) श्री.ऋषिकेश पवळ, पो.शि. १२०९४ हणमंत माने, पोहवा / ०६२२५ दिलीप सनेर यांनी पार पाडली आहे.
सायबर फसवणुक हेल्पलाईन क्रमांक- 1930
सायबर फसवणुक हेल्पलाईन वेबसाईट- www.cybercrime.gov.in

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट