गोंदियात भरोसा पथक व दामिनी पथकाला बालविवाह रोखण्यात यश..

गोंदिया
;सह संपादक- रणजित मस्के पोलीस अधीक्षक गोंदिया मा. श्री.गोरख भामरे, अपर पोलीस अधीक्षक श्री. नित्यानंद झा, यांच्या आदेशान्वये प्रभारी पोलीस उप अधीक्षक (गृह) श्रीमती नंदिनी चानपूरकर यांचे मार्गदर्शाखाली भरोसा सेल व दामिनी पथक कार्यरत असून महिला , मुली व लहान बालके यांच्या संरक्षणार्थ कार्य करीत आहे.. या अनुषंगाने दिनांक 07/03/2025 रोजी दामिनी पथकास गोपनीय माहिती मिळाली की, मोहरानटोली (धामणगाव) तह. आमगाव येथे बालविवाह नियोजित करण्यात आलेले आहे….. त्यावर भरोसा सेल गोंदिया सह दामिनी पथकाचे अंमलदार आणि जिल्हा बाल संरक्षण अधिकारी व त्यांचा संपूर्ण स्टाफ असे नियोजित विवाहस्थळी पोहचले तेव्हा तिथे लग्न समारंभाची तयारी चालू होती व मंडप टाकलेले होते नियोजित वर वधू यांची चौकशी केली असता मुलाचे वय 17 वर्ष राह. आमगाव, शिक्षण – नाही . मुलीचे नाव- वय 17 वर्ष राहणार आमगाव असल्याचे निष्पन्न झाले… त्यावर दामिनी पथक व जिल्हा बाल संरक्षण अधिकारी यांनी मुला मुलींचे पालक यांना कायदयाबाबत माहिती देवून समज दिली.. तेव्हा मुला मुलींचे पालक यांनी नियोजित विवाह रद्द करत असल्याचे मान्य केले…. व सदर मुलगा मुलगी व त्यांचे पालक यांना सी.डब्लू.सी.समिती समोर हजर करण्यात आले. सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक गोंदिया मा. श्री. गोरख भामरे, अपर पोलीस अधीक्षक श्री. नित्यानंद झा, यांचे निर्देशान्वये प्रभारी पोलीस उप-अधीक्षक (गृह) श्रीमती नंदिनी चानपूरकर, यांचे मार्गदर्शनाखाली म.स.पो. नि.मनिषा निकम नेमणूक भरोसा सेल गोंदिया सह दामिनी पथकाचे पो.शि. राजेंद्र अंबादे, मपोशि पूनम मंजुटे, वैशाली भांदक्कर, प्रीती बुरेले, नापोशी राधेश्याम रहांगडाले, श्री. गजानन गोबाळे (जिल्हा बाल संरक्षण अधिकारी) रवींद्र टेंभुर्णे, मनीषा चौधरी, भागवत सूर्यवंशी, अशोक बेलेकर, अमित बेलेकर, ज्ञानेश्वर पटले, दीपमाला भालेराव यांनी केली.

