गोंदियात वयोमानाने सेवानिवृत्त झालेल्या पोलीस अंमलदार यांचे निरोप व सत्कार कार्यक्रम संपन्न..

0
Spread the love

उपसंपादक-रणजित मस्के

गोंदिया :– आज दिनांक 30 नोव्हेंबर 2023 रोजी पोलीस अधीक्षक कार्यालय गोंदिया येथील कॉन्फरन्स हॉल मध्ये माहे- नोव्हेंबर -2023 मध्ये गोंदिया जिल्हयाचे आस्थापनेवरील नियत वयोमानाने सेवानिवृत्त झालेले पोलीस अंमलदार

1) सहाय्यक पोलीस उप- निरीक्षक श्री. टेकचंद जैपाल गाते तसेच

*2) पोलीस हवालदार श्री. भक्तराज हरिचंद रामटेके

      यांचे निरोप सत्कार सभारंभाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते... सदर निरोप सत्कार कार्यक्रमवेळी पोलीस अधीक्षक गोंदिया मा. श्री. निखील पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक श्री. नित्यानंद झा, यांचे शुभ हस्ते नियत वयोमानाने सेवानिवृत्त झालेल्या अंमलदार यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, सेवानिवृत्त प्रमाणपत्र, ओळखपत्र, शुभेच्छापत्र, देवुन त्यांचे सत्कार करण्यात आले.....

    🔹सदर कार्यक्रमात पोलीस अधीक्षक गोंदिया मा. श्री. निखील पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक श्री नित्यानंद झा, प्रभारी पोलीस उप अधिक्षक (गृह), श्रीमती योगिता चाफले तसेच पोलीस अधिकारी- अंमलदार उपस्थित होते.

     🔹 सदर कार्यक्रमाचे सुत्र संचालन पोलीस निरीक्षक, तथा अति कार्य. पोलीस उप अधिक्षक (गृह), श्रीमती योगिता चाफले यांनी केले...तर सदर कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्याकरीता कल्याण शाखा येथील, श्रीमती योगिता चाफले, पोहवा राजु डोंगरे, राज वैद्य यांनी कार्यवाही पार पाडली.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट