गोंदियात न्याय दंडाधिकारी यांनी घरफोडी करणार्या सराईत चोरटय़ांना ठोठावला ५ वर्षे सक्षम कारावास…

उपसंपादक- रणजित मस्के
गोंदिया :– मा. मुख्य न्यायदंडाधिकारी, न्यायालय गोंदिया श्री. अभिजीत कुलकर्णी, यांचा न्यायनिवाडा …
घरफोडी करणारे सराईत चोरटे नामे – *1) उदय उर्फ आऊ रमेश उपाध्याय, वय 19 वर्ष, रा. मुर्री चौकी समोर गोंदिया, 2) धम्मदिप अनिल गजभिये, वय 19 वर्ष, रा. कुंभारेनगर गोंदिया यांना घरफोडी च्या गुन्हयात दिनांक 25/04/2024 रोजी न्यायनिवाडा करत ठोठावली 5 वर्षे सश्रम कारावास व प्रत्येकी 1000/- रु. द्रव्यदंडाची शिक्षा..
▶️ याबाबत थोडक्यात हकीगत अशी की, दिनांक 31/10/23 रोजी फिर्यादी डॉ. श्री. सलील वसंतराव पाटील, रा. राजाभोज कॉलोनी मरारटोली गोंदिया, यांनी पो.स्टे. ला तक्रार दिली होती की, त्यांचे अधिपत्याखालील आयुष्यमान भारत अभियान अंतर्गत प्राथमिक आरोग्य केन्द्र कुंभारेनगर गोंदिया येथील लाकडी दाराची पाटी तोडुन आत प्रवेश करुन आरोग्य केन्द्रामधील 03 नग मॉनिटर, 03 नग सी. पी. यु. एकुण किमती 75,000/- रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्याचे तक्रारी वरुन पो. स्टे. ला गोंदिया शहर अपराध क्रमांक 704/23 कलम 454, 457, 380 भादंविसं. प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात करण्यात आलेला होता…
मा. वरिष्ठांचे दिलेले निर्देश तपास सुचना प्रमाणे सादर गुन्ह्यांचा तपास करण्यात आले……गुन्ह्याचे तपासात आरोपीचा शोध घेवुन नमूद गुन्ह्यात आरोपी नामे – 1) उदय उर्फ आऊ रमेश उपाध्याय, वय 19 वर्ष, रा. मुरी चौकी समोर गोंदिया, 2) धम्मदिप अनिल गजभिये, वय 19 वर्ष, रा. कुंभारेनगर गोंदिया यांना गुन्ह्यांत अटक करुन गुन्ह्यायातील चोरीस गेलेला मुद्देमाल हस्तगत करण्यात आला…. आरोपीतां विरुधद सबळ साक्ष, पुरावे गोळा करण्यात आले, सदर गुन्ह्याचा तपास पुर्ण करुन तपासाअंती आरोपीतांविरुध्द गुन्ह्याचे दोषारोपपत्र मा. मुख्य न्यायदंडाधिकारी, न्यायालय गोंदिया येथे सादर करुन फौजदारी खटला क्रमांक- 598/2023 प्रमाणे चालविण्यात आला….
सदर खटल्याचे सुनावणीत नमूद दोन्ही आरोपितांविरुद्ध सबळ साक्ष पुराव्यावरून दोषसिध्द झाल्याने मा. मुख्य न्यायदंडाधिकारी, श्री. अभिजीत कुलकर्णी, न्यायालय गोंदिया यांनी दिनांक 25/04/2024 रोजी दोन्ही अरोपितांना 5 वर्ष सश्रम कारावास व प्रत्येकी 1000/- रू. द्रव्य दंडाची शिक्षा ठोठावलेली आहे. सदर शिक्षा झालेल्या गुन्हयाचा तपास पो. हवा. जागेश्वर उईके पो. स्टे. गोंदिया शहर यांनी केला असुन खटल्याचे युक्तीवाद सहायक सरकारी अभियोक्ता श्री. कमलेश दिवेवार, तसेच न्यायालयीन कामकाज पो. हवा. ओमराज जामकाटे, पोशि. किरसान यांनी पाहिले……..सदर गुन्ह्याचे उत्कृष्ट तपासाबाबत पोलीस अधिक्षक, गोंदिया, मा. श्री. निखील पिंगळे, अपर पोलीस अधिक्षक, श्री. नित्यानंद झा, उपविभागीय पोलीस अधिकारी गोंदिया, श्रीमती रोहिणी बानकर मॅडम, पोलीस स्टेशन गोंदिया शहरचे ठाणेदार, पोलीस निरिक्षक श्री. चंद्रकांत सुर्यवंशी यांनी अभिनंदन कौतुक केले आहे.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com