वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर गोंदिया ट्रॅफिक पोलिसांचा कारवाईचा बडगा…

0
Spread the love

उपसंपादक-रणजित मस्के

गोंदिया :- यात विशेषतः गोंदिया जिल्हा शेजारील मध्यप्रदेश, छत्तीसगड राज्यातील वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चारचाकी वाहनांवर गोंदिया ट्रॅफिक पोलिसांनी मोटार वाहन कायद्यान्वये कारवाई केलेली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, गोंदिया जिल्हा पोलीस अधीक्षक, श्री. निखिल पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक श्री. नित्यानंद झा, यांनी जिल्ह्यातील वाढते वाहन अपघात आणि त्यातही विशेष म्हणजे वाहन अपघातात वाढते मृत्यूचे प्रमाण यावर आळा बसावा, अंकुश व्हावा या अनुषंगाने नियम न पाळणाऱ्यावर, वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आणि जिल्ह्यातील नागरिकांना, विद्यार्थी, मुले – मुली, सुजान नागरिक यांना वाहतूक नियमांची माहिती व्हावी याकरीता जनजागृती करण्याचे निर्देश पो.नि. जिल्हा वाहतूक शाखा, गोंदिया यांना दिलेले होते.

मा. वरिष्ठांनी दिलेल्या निर्देश सूचना मार्गदर्शनाखाली वाहतूक शाखेचे प्रभारी पो.नि.श्री. किशोर पर्वते, स.पो.नि. राहुल पाटील, यांचे नेतृत्वात वाहतूक शाखेतील अधिकारी- अंमलदार यांनी वाहतूकीचे नियम न पाळणाऱ्या, तसेच वाहतुक नियमनांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन व चालकांवर ज्यात प्रामुख्याने

1) विना नंबर प्लेट, फॅन्सी नंबर प्लेट, क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी बसविणे, विना सीट बेल्ट, कर्न कर्कश हॉर्न वाजविणारे , अडथळा निर्माण होईल अशी पार्किंग करणे, पोलीसांचा ईशारा न पाळणे, ईत्यादिवर आणि modified cylecer…. अश्या एकुण- 200 वाहनांवर कारवाई करण्यात आलेली आहे….. त्याचप्रमाणे खाजगी चारचाकी वाहनात अवैधरित्या सायरन बसविणे- अश्या 10 वाहनावर मोटार वाहन कायद्यान्वये कारवाई करण्यात आलेली आहे.. दंडात्मक कारवाई करून शुल्क आकारण्यात आले आहे.

      गोंदिया जिल्हा पोलीस दलातर्फे वेळोवेळी जिल्ह्यातील सर्व जनतेला, नागरिकांना, शाळकरी मुले- मुली, युवावर्ग, यांना वाहतुकीचे नियमनांचे पालन करण्या बाबत जनजागृति करण्यात आली आहे... त्याचप्रमाणे गोंदिया शहरात बसविण्यात आलेल्या वाहतूक पोलिस बूथ वरील माईक प्रणाली द्वारे वाहतुकीचे नियम पाळण्याबाबत जनजागृती करण्यात येवून आवाहन करण्यात येत आहे....  पुनश्च याद्वारे  जिल्ह्यातील सर्व सुज्ञ नागरिकांना. जनतेला आवाहन करण्यात येतेय की, नागरिकांनी वाहतुकीच्या नियमांचे सक्तीने स्वतः जागृत होऊन वाहतुकीचे नियमन पाळावे.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट