गोंदिया स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बजरी व रेतीची चोरी करणाऱ्या चोरटयांना केले जेरबंद…

सह संपादक – रणजित मस्के
गोंदिया :
आरोपी नामे-1) मोहित ध्रुवराज मस्करे वय 21 रा. ढाकणी 2) योगेश मनोज चंदेल वय 24 रा. दवणीवाडा अशी जेरबंद करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत……गुन्ह्यात फरार पाहिजे आरोपी नामे-3) रानु उर्फ सूर्यकांत तिवारी रा. पाठक कॉलनी, फुलचुर 4) अजय लील्हारे रा. ढाकणी (जे. सी .बी. मालक) 5) रणजीत शहारे रा. फत्तेपूर (जे. सी .बी. ऑपरेटर)
अशी चोरीच्या गुन्ह्यात सहभागी ईतर चोरट्यांची नावे आहेत..


📍. याबाबत थोडक्यात माहिती अशी की फिर्यादी नामे-परमेश्वर गणेश लिचडे राहणार- फुलचुरटोला व्यवसाय बिल्डिंग मटेरियल सप्लायर, यांचे मालकीचे घर बांधकामाचे साहित्य – 6 टिप्पर बजरी व 14 टिप्पर रेती किंमती 1,62,000/- रुपयाची फुलचुर पेठ गुरमित भाटिया यांच्या ऑफिस समोरील खुल्या जागेत ठेवली असता दिनांक 29/01/2025 रोजी चे 23.00 वाजता ते दिनांक 11/03/2025 रोजी चे 06.00 वाजता दरम्यान कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे फिर्यादीचे तक्रारीवरून पो ठाणे गोंदिया ग्रामीण येथे अपराध क्र 149/2025 कलम 303 (2) भा.न्या.सं. 2023 अन्वये दाखल करण्यात आले आहे..
मा. वरिष्ठांचे निर्देश सूचना मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस पथक जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यास दाखल अउघड चोरी, घरफोडी गुन्ह्याचा समांतर तपास करीत असताना पो. स्टे. गोंदिया ग्रामीण वर नमूद गुन्ह्याचे अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे — आरोपी नामे-1) मोहित ध्रुवराज मस्करे वय 21 रा. ढाकणी 2) योगेश मनोज चंदेल वय 24 रा. दवणीवाडा यांना ताब्यात घेऊन जेरबंद करण्यात आले असून त्यांना नमुद गुन्ह्याचे अनुषंगाने सविस्तर विचारपूस, चौकशी,तपास केला असता त्यांनी बजरी व रेती चोरी केल्याचे सांगून आरोपी नामे- 3) रानु उर्फ सूर्यकांत तिवारी राह. पाठक कॉलनी फुलचुर याचे सांगण्यावरून आरोपी- 4) अजय लील्हारे रा. ढाकणी (जे. सी .बी. मालक) 5) रणजीत शहारे रा. फत्तेपूर (जे. सी .बी. ऑपरेटर) यांचे मदतीने चोरी केल्याचे कबूल केले आहे. आरोपी यांचे ताब्यातून गुन्ह्यात रेती व बजरी चोरी करीता वापरलेले 1 जेसीबी वाहन व 1 टिप्पर असा किंमती 45 लक्ष रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करून गुन्ह्यात जप्त करण्यात आले आहे….जेरबंद करण्यात आलेल्या दोन्ही आरोपीताना गुन्ह्याचे पुढील तपास, कामाने गोंदिया ग्रामीण पोलीसांचे स्वाधीन करण्यात आले आहे..
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक गोंदिया मा. श्री. गोरख भामरे, अप्पर पोलीस अधीक्षक श्री. नित्यांनंद झा, यांचे निर्देश सूचनाप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे…..प्रभारी श्री. धीरज राजूरकर, यांच्या नेतृत्वाखालील स्था.गु.शा. पोलीस पथकाने कामगिरी बजावली आहे..