गोंदिया ग्रामीण ठाणे पोलीसानी धडक कारवाई करुन देशी विदेशी दारुचा 77 हजार 275 रुपयांचा मुद्देमाल केला जप्त…

उपसंपादक-रणजित मस्के
गोंदिया :-पोलीस अधिक्षक गोंदिया श्री. निखिल पिंगळे, अपर पोलीस अधिक्षक गोंदिया, कॅम्प देवरी श्री. नित्यानंद झा, यांनी मावळते वर्ष व येणारे नवीन वर्षाच्या आगमन प्रसंगी जिल्ह्यात शांतता प्रस्थापित व्हावी, कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी याकरिता जिल्ह्यांतील सर्व पोलीस ठाणे हद्दीतील अवैध धंद्यांवर प्रभावी कारवाई करण्याचे निर्देश सूचना दिलेल्या आहेत…..
मा. वरिष्ठांचे आदेश निर्देशाप्रमाणे व मार्गदर्शनाखाली संपुर्ण जिल्ह्यात अवैध धंद्यांवर प्रभावी धाड कारवाईची ऑपरेशन क्रॅक डाऊन मोहीम राबविण्यात येत आहे…..
या अनुषंगाने उपविभागीय पोलीस अधिकारी, उपविभाग गोंदिया श्री. सुनील ताजणे यांचे मार्गदर्शनाखाली तसेच पोलीस निरीक्षक श्री.चंद्रकांत काळे, यांचे मार्गदर्शनात गोंदिया ग्रामीण पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे दिनांक- 29/12/ 23 रोजी धाड कारवाई केली असता असता आरोपी नामे – सुजित मंगलदास डोंगरे रा. अदासी याचे राहते घराचे घरझडतीत देशी विदेशी दारूचा साठा किंमती 77 हजार 275 रुपयांचा मुद्देमाल अवैधरीत्या मिळून आल्याने जप्त करण्यात आलेला आहे… आरोपी विरुद्ध पो.स्टे. गोंदिया ग्रामीण येथे अप. क्र. 583/23 कलम 65 (इ) म.दा.का. नुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे….
सदरची दर्जेदार धाड कारवाई मा. वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली आणि उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. सुनील ताजने यांचे मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक श्री. चंद्रकांत काळे, यांचे नेतृत्वात गोंदिया ग्रामीण पोलीस अधिकारी- अंमलदार यांनी केलेली आहे.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com