गोंदिया पोलीसांतर्फे सुरक्षित बेरोजगार युवकांसाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन संपन्न..

सह संपादक- रणजित मस्के
गोंदिया :-गोंदिया जिल्हा पोलीस दल व जी. डी. एक्स. सिक्युरिटी सोल्युशन इंडिया, प्रायव्हेट लिमिटेड बिलास्पुर, छत्तीसगड यांचे संयुक्त विद्यमाने –
“पोलीस दादालोरा खिडकी योजने अंतर्गत” नक्षलग्रस्त भागातील सुशिक्षित बेरोजगार युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी याकरिता नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत रोजगार मेळाव्याचे भव्य आयोजन…
⏩ गोंदिया जिल्हा पोलीस अधीक्षक मा. श्री. गोरख भामरे, यांच्या संकल्पनेतून व अप्पर पोलीस अधीक्षक, गोंदिया कॅम्प देवरी , श्री. नित्यानंद झा, उपविभागीय पोलीस अधिकारी उपविभाग देवरी श्री विवेक पाटील, यांच्या मार्गदर्शनाखाली
“पोलीस दादालोरा खिडकी योजना” अंतर्गत जी. डी. एक्स. सेक्युरिटी सोल्युशन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, छत्तीसगड, बिलासपुर व गोंदिया जिल्हा पोलीस यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 20 फेब्रुवारी 2025 ते 22 फेब्रुवारी 2025 पर्यंत अतिसंवेदनशील नक्षलग्रस्त भागातील बेरोजगार युवकांकरिता पोलीस स्टेशन सालेकसा, चीचगड, डुग्गीपार या ठिकाणी सुरक्षा गार्ड, सुरक्षा पर्यवेक्षक व संगणक ऑपरेटर या पदाकरिता रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.




सदरचे आयोजित रोजगार मेळाव्या मध्ये नक्षलग्रस्त भागातील 400 ते 500 सुशिक्षित बेरोजगार नव-युवकांनी सहभाग नोंदवला…त्यांची शारीरिक चाचणी व त्यांचे पात्रतेनुसार डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून 106 युवकांची जी. डी. एक्स. कंपनी मध्ये सुरक्षा गार्ड, सुरक्षा पर्यवेक्षक, संगणक ऑपरेटर या पदाकरिता निवड करण्यात आलेली आहे. निवड करण्यात आलेल्या युवकांना तीन दिवसाचे प्रशिक्षण देऊन लगेच त्यांना बिलासपूर, रायगड, रायपूर व भिलाई येथील कंपनीमध्ये जॉइनिंग देण्यात येणार आहे. सदरचे नाविन्यपूर्ण उपक्रम उत्तमरित्या राबवून गोंदिया जिल्हा दलाचे नावलौकिक करण्यात आले असून सुशिक्षित बेरोजगार युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
“पोलीस दादालोरा खिडकी योजनेअंतर्गत” सदरचे नाविन्यपूर्ण उपक्रम वरिष्ठांचे मार्गदर्शनात पोलीस स्टेशन सालेकसा ठाणेदार श्री. भुषण बुराडे, चिचगड ठाणेदार श्री. तुषार काळेल , डुग्गीपार ठाणेदार श्री.मंगेश काळे आणि प्रभारी अधिकारी पो. नि.नक्षल सेल गोंदिया श्री. प्रमोद भातनाते, सपोनी संजय नाईक, पो उप.नि. श्रीकांत हत्तीमारे, पोलीस अंमलदार भास्कर हरिणखेडे यांचे अथक परिश्रम प्रयत्नांनी पार पाडण्यात आले आहे.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com