गोंदिया पोलीसांनी गुन्हयात जप्त 468.430 किलोग्रॅम गांजा अंमली पदार्थ जाळुन (इन्सीनरेशन) पध्दतीने केला नाश..

सह संपादक -रणजित मस्के
गोंदिया


🔹 अंमली पदार्थनाश समिती गोंदिया ने घेतलेल्या निर्णयानुसार वरिष्ठांकडून प्राप्त निर्देशाप्रमाणे गुन्हयात जप्त अंमली पदार्थ जाळुन (इन्सीनरेशन)पध्दतीने नाश करण्याकरीता उप प्रादेशिक अधिकारी, महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ, नागपुर यांनी मे. महाराष्ट्र एनव्हायरो पावर लिमीटेड, बुटीबोरी एमआयडीसी जि. नागपुर येथे दिनांक14/07/2025 रोजी अंमली पदार्थनाश समिती गोंदिया समक्ष अंमली पदार्थाची जाळुन (इन्सीनरेशन ) विल्हेवाट लावण्याची परवानगी दिल्याने पोलीस स्टेशन रामनगर अपराध क्रमांक 509/2018 मधील 5.695 किं.ग्रॅ. , पोलीस स्टेशन देवरी अपराध क्रमांक 214/2020 मधील 230 ग्रॅम, पोलीस स्टेशन देवरीअपराध क्रमांक 228/2020 मधील 3.345 कि.ग्रॅ्म , पोलीस स्टेशन डुग्गीपार अपराधक्रमांक 49/2019 मधील 432.335 कि.ग्रॅ्म , पोलीस स्टेशन डुग्गीपार अपराध क्रमांक104/2022 मधील 26.830 कि.ग्रॅ्म् असा एकूण 468.430 किलोग्रॅम गांजा अंमली पदार्थ मे.महाराष्ट्र एनव्हायरो पावर लिमीटेड, बुट्टीबोरी(एमआयडीसी), जिल्हा-नागपूर येथील प्रोसेस इंजिनीअर यांचे देखरेखीत प्लान्टमधील स्वयंचलीत कन्व्हेयर बेल्टवर ठेवून बॉयलरमध्ये टाकुन जाळून नाश करण्यात आले.
🔸 अंमली पदार्थनाश समिती अध्यक्ष श्री. गोरख भामरे पोलीस अधिक्षक गोंदिया यांचे मार्गदर्शनात, पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम अहेरकर स्थानिक गुन्हे शाखा, गोंदिया , रामदास शेवते, प्रभारी पोलीसउपअधिक्षक, गृह (मुख्या.) गोंदिया ,मे.महाराष्ट्र एनव्हायरो पावर लिमीटेड, बुट्टीबोरी(एमआयडीसी), जिल्हा-नागपूर येथील प्रोसेस इंजिनीअर प्रशांत मस्के , पो.हवा.सुबोधकुमार बिसेन, पो.शि.संतोष केदार स्थानिक गुन्हे शाखा गोंदिया शासकिय फोटोग्राफर पो.शि. अतुल कोल्हाटकर नक्षलसेल गोंदिया तसेच पोलीस ठाणे रामनगरचे ,पो.हवा. भाष्कर पारधी ,पोलीस ठाणे डुग्गीपारचे स.फौ. गेंदलाल उदापुरे, पोलीस ठाणे देवरीचे स.फौ. दिनराज वरखडे यांचे समक्ष विविध पोलीस स्टेशन मधील गुन्हयात जप्त अंमली पदार्थ जाळुन (इन्सीनरेशन)पध्दतीने नाश करण्यात आला.