गोंदिया पोलीसांकडून फिरते रुग्णालय लोकार्पण सोहळ्याचे आयोजन संपन्न

0
WhatsApp Image 2025-02-19 at 5.28.20 PM
Spread the love

सह संपादक- रणजित मस्के

गोंदिया :-गोंदिया जिल्हा पोलीस दल व ट्रायबल वेल्फेअर कमिटी, रोटरी इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट 3030, सह शालिनीताई मेघे हॉस्पिटल व रिसर्च सेंटर वानाडोंगरी, नागपूर जीवन आधार सामाजिक संस्था तसेच माऊली मित्र मंडळ नागपूर यांचे संयुक्त विद्यमाने “दादालोरा खिडकी योजना उपक्रमांतर्गत”* ” फिरते रुग्णालय मोटार बस व्हॅन चे” लोकार्पण सोहळा कार्यक्रम संपन्न

🕹️ गोंदिया हा नक्षल प्रभावित जिल्हा असुन गोंदिया जिल्हा पोलीस दलातर्फे जिल्हयातील जनतेच्या हिताकरीता (विशेषतः नक्षलग्रस्त भागातील जनतेच्या कल्याणा करीता) कायम अग्रेसर राहुन विविध कल्याणकारी नाविण्यपूर्ण उपक्रम वेळोवेळी राबविण्यात येत असतात. त्याचाच एक भाग म्हणुन पोलीस अधीक्षक गोंदिया मा. श्री. गोरख भामरे, यांच्या संकल्पनेतुन आणि अपर पोलीस अधीक्षक, गोंदिया (कॅम्प देवरी) मा. श्री. नित्यानंद झा, यांच्या मार्गदर्शनाखाली नाविण्यपूर्ण उपक्रमांतर्गत जिल्हयातील दुर्गम, अति- दुर्गम भागातील गोर-गरीब, तसेच आदिवासी बांधवांचे आरोग्य निरोगी राहावे यादृष्टीने गोंदिया जिल्हा पोलीस दल, ट्रायबल वेलफेअर कमिटी, रोटरी इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट 3030 सह-आयोजक शालिनीताई मेघे हॉस्पीटल व रिसर्च सेंटर, वानाडोंगरी नागपूर, जीवन आधार सामाजिक संस्था तसेच माऊली मित्र मंडळ, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आज दिनांक 18 फेब्रुवारी 2025 रोजी “फिरते रुग्णालय बस व्हॅन चे लोकार्पण सोहळा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

सदर फिरते रुग्णालय बस व्हॅन मध्ये शालिनी ताई मेघे हॉस्पीटल व रिसर्च सेंटर वानाडोंगरी, नागपूर येथील स्त्री रोग, अस्थिरोग, नेत्ररोग, बालरोग, दंतरोग, शल्य चिकीत्सक, कान-नाक- घसा, न्युरो सर्जन, किडनी रोग तज्ञ, हृदयरोग तज्ञ, इ. वैद्यकिय चमु उपस्थित राहणार असून गोंदिया जिल्हयातील आदिवासी बहुल विशेषतः नक्षलग्रस्त भागातील वेगवेगळया गावांमध्ये सदर रुग्णालय फिरणार आहे… वैद्यकीय अधिकारी यांचे हस्ते नागरीकांची निःशुल्क तपासणी करण्यात येणार आहे.

रोटरी क्लब, जीवन आधार संस्था, शालिनी ताई मेघे हॉस्पीटल नागपूर, माऊली सेवा मित्र मंडळ नागपुर यांचे गोंदिया जिल्हा पोलीस दलास नेहमी सहकार्य मिळत असते. त्यांच्या समन्वयाने गोंदिया जिल्हयात पोलीस दादालोरा खिडकी योजना अंतर्गत कित्येक आरोग्य शिबीर राबविण्यात आले आहेत. विशेषतः सन-2022 ते 2024 मध्ये सर्व सशस्त्र दुरक्षेत्र हद्दीत ऑपरेशन रोशनी अंतर्गत मोतीबिंदु निदान व शस्त्रक्रिया शिबीर राबविण्यात आले आहेत. त्या मध्ये 3800 पेक्षा जास्त रुग्णांनी शिबीराचा लाभ घेतला असुन 300 पेक्षा जास्त नागरीकांची मोतीबिंदु ची मोफत यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आलेली आहे.

सदर “फिरते रुग्णालय बस व्हॅन” चे लोकार्पण सोहळा कार्यक्रमास प्रामुख्याने पोलीस अधीक्षक गोंदिया श्री. गोरख भामरे सर, ट्रायबल वेलफेअर कमिटी, रोटरी इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट 3030 चे चेअरमन श्री. राजीव वरभे सर,शालीनी ताई मेघे हॉस्पीटल नागपूरचे अॅडमिनीस्ट्रेटीव्ह ऑफीसर डॉ. अश्वीन रडके सर,शालीनीताई मेघे हॉस्पीटल नागपुर चे समाज कल्याण अधिकारी श्री. अजय ठाकरे सर,माऊली सेवा मित्र मंडळ चे अध्यक्ष श्री. सुहास खरे सर, शालीनी ताई मेघे हॉस्पीटल नागपुर चे स्टॉफ मेंबर, श्री. विक्की सिंग सर तसेच पोलीस अधीक्षक कार्यालयातील अधिकारी अंमलदार, मंत्रालयीन स्टाफ मोठ्या संख्येने या उपस्थित होते…. लोकार्पण सोहळा कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नक्षल सेल येथील पोउपनिरीक्षक श्री. श्रीकांत हत्तीमारे यांनी केले तर आभार प्रदर्शन कल्याण शाखेचे प्रभारी पोलीस निरीक्षक श्री. रामेश्वर पीपरेवार यांनी मानलेत..

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट