गोंदिया पोलीसानी २४ तासात घरफोडीचा गुन्हा उघड करुन किंमती ३०,४७०/- रु. चा मुद्येमाल केला हस्तगत

0
WhatsApp Image 2025-04-08 at 9.52.42 PM (1)
Spread the love

सह संपादक – रणजित मस्के

गोंदिया

गोंदिया शहर गुन्हे प्रकटीकरण पथकाची कामगीरी

📍. याबाबत थोडक्यात हकिगत अशी की, फिर्यादी श्री. प्रशांत चुन्नीलाल सारंगपुरे, रा. मालवीय शाळेजवळ, चंद्रशेखर वार्ड गोंदिया यांच्या राहत्या घराचा दि. ६/४/२०२५ चे २३.०० वा. ते दि. ७/४/२०२५ चे ५.४५ वा. दरम्यान कोणीतरी अज्ञात चोरट्याने समोरील दरवाजा खोलुन घरातील लाकडी आलमारी ठेवलेले १) एक सोन्याची नथ २) चांदीची एक जोड पायल ३) पर्समध्ये ठेवलेले नगदी ४७०/- रु., ४) एक रेडमी कंपनीचा मोबाईल हँडसेट ५) एक एम.आय. कंपनीचा मोबाईल हँडसेट असा एकूण किंमती ३०,४७०/- रु. चा मुद्देमाल चोरुन नेल्याचे फिर्यादीचे तक्रारीवरुन पो.स्टे. गोंदिया शहर येथे अप.क्र. २४८/२०२५ क. ३३१(४), ३०५ भा.न्या. सं. २०२३ अन्वये दि. ७/४/२०२५ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

  पो.स्टे. गोंदिया शहर येथील डी.बी. पथकातील पोलीस अंमलदार यांनी गुन्हा दाखल होताच गोपनिय खबरेच्या आधारे आरोपी - देव प्रकाश बनोटे, वय १९ वर्षे, रा. मालवीय शाळेजवळ, चंद्रशेखर वार्ड गोदिया यास दि. ०७/०४/२०२५ रोजी ताब्यात घेवून त्याच्याकडे गुन्हयाच्या अनुषंगाने कसोशीने व बुध्दीकौशल्याने तपास केला असता त्याने सदरचा गुन्हा केल्याचे कबुल केले. त्यास दि. ७/४/२०२५ रोजी गुन्ह्यात अटक करुन त्याच्या राहत्या घरुन गुन्हयात चोरीस गेलेला संपूर्ण मुद्येमाल किंमती एकुण ३०,४७०/-रु. चा हस्तगत करुन जप्त करण्यात आले आहे.  सदर गुन्हयाचा पुढील तपास पो. हवा. कवलपालसिंग भाटीया हे करीत आहेत.

 सदरची कामगीरी श्री. गोरख भामरे, पोलीस अधिक्षक, गोंदिया, श्री. नित्यानंद झा, अपर पोलीस अधिक्षक गोंदिया, श्रीमती रोहीणी बानकर, उपविभागीय पोलीस अधिकारी गोंदिया यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन गोंदिया शहरचे पोलीस निरिक्षक श्री किशोर पर्वते, डी.बी. पथकाचे पो.हवा. कवलपालसिंग भाटीया, सुदेश टेंभरे, निशिकांत लॉदासे, प्रमोद चव्हाण, दिपक राहांगडाले, सतिश शेंडे, पोशि. सुभाष सोनवाने, दिनेश बिसेन, मुकेश रावते, अशोक राहांगडाले, प्रमोद शेंडे, सोनु नागपुरे, राकेश बंजार यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट