गोंदिया पोलीस दल,रोटरी क्लब ऑफ नागपूर आणि माऊली मित्र मंडळातर्फे अति दुर्गम भागातील आदिवासी विद्यार्थ्याना सायकली वाटप …

उपसंपादक-रणजित मस्के


गोंदिया :- गोंदिया जिल्हा पोलीस दल आणि रोटरी क्लब ऑफ नागपूर साऊथ ईस्ट, तसेच माऊली मित्र मंडळ, नागपूर यांच्या सौजन्याने आयोजित कार्यक्रमाअंतर्गत अतिदुर्गम आदिवासी भागातील गरजू गोर- गरीब विद्यार्थ्यांना पोलीस अधीक्षक श्री. निखिल पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक श्री. नित्यानंद झा, रोटरी क्लब ऑफ नागपूर साऊथ ईस्ट, चे प्रेसीडेंट श्री. राजीव वरभे, माऊली सेवामित्र मंडळचे अध्यक्ष श्री. सुहास खरे, यांचे हस्ते सायकलींचे वाटप कल्याणकारी नाविण्यपूर्ण स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला होता.



याबाबत थोडक्यात माहिती अशी की, गोंदिया जिल्हा पोलीस दलातर्फे जिल्हयातील जनतेच्या हिताकरीता (विशेषतः नक्षलग्रस्त भागातील जनतेच्या कल्याणकरीता ) कायम अग्रेसर राहुन विविध कल्याणकारी नाविण्यपूर्ण उपक्रम वेळोवेळी राबविण्यात येत असतात.....
त्याचाच एक भाग म्हणुन पोलीस अधीक्षक गोंदिया, श्री. निखिल पिंगळे, यांच्या संकल्पनेतुन तसेच अपर पोलीस अधीक्षक, गोंदिया (कॅम्प- देवरी) श्री. नित्यानंद झा, यांच्या मार्गदर्शनाखाली नाविण्यपूर्ण उपक्रमांतर्गत जिल्हयातील दुर्गम, अति- दुर्गम भागातील गोर- गरीब, आदिवासी भागात वास्तव्यास असणाऱ्या आणि शाळा-कॉलेज च्या शिक्षणाकरिता 5 ते 10 कि. मी. पायी पायी ये-जा करणाऱ्या अशा गरजु- गरिब व आदिवासी मुलींना पायी येण्याचा त्रास सहन करावा लागणार नाही व जेणेकरुन त्यांचा वेळ वाचुन त्यांना शिक्षणा करिता भरपुर वेळ मिळुन अभ्यासाला वाव मिळेल व आरोग्य सुदृढ राहुन त्यांचा सर्वांगीन विकास होईल आणि पोलीस व जनता यांच्यातील संबंध सुदृढ होण्यास चालना मिळेल यादृष्टीने गोंदिया जिल्हा पोलीस दलाच्या पुढाकाराने रोटरी क्लब ऑफ नागपूर साऊथ ईस्ट, तसेच माऊली मित्र मंडळ, नागपूर यांच्या सौजन्याने आज दिनांक 27 डिसेंबर 2023 रोजी पोलीस स्टेशन सालेकसा येथे पो. स्टे. अंतर्गत येणारे सशस्त्र दुरक्षेत्र पिपरीया, बिजेपार, व दरेंकसा येथील 15 गरजु शालेय विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते....
सदर आयोजित कार्यक्रमात मा.श्री निखील पिंगळे, पोलीस अधीक्षक, गोंदिया, मा. श्री. नित्यानंद झा, अपर पोलीस अधीक्षक, गोंदिया (कॅम्प- देवरी), तसेच रोटरी क्लब साऊथ ईस्ट नागपूरचे प्रेसीडेंट श्री. राजीव वरभे सर, माऊली सेवामित्र मंडळ चे अध्यक्ष श्री. सुहास खरे सर, यांचे हस्ते गरजू विद्यार्थ्यांना 15 सायकलींचे वाटप करण्यात आले..... त्याचप्रमाणे जिल्ह्यातील अतिदुर्गम आदिवासी भागातील ईतर 8 सशस्त्र दूरक्षेत्र अंतर्गत गोर -गरीब गरजू आदिवासी विद्यार्थ्यांना 40 सायकली चे वाटप करण्यात आलेले असुन सदरचे कार्यक्रमा अंतर्गत जिल्ह्यात एकूण 55 सायकलींचे वाटप करण्यात आलेले आहे.....
मा. वरिष्ठांचे मार्गदर्शनात सदर कार्यक्रम यशस्वी व्हावा याकरिता श्री. संकेत देवळेकर, उपविभागिय पोलीस अधिकारी, देवरी अतिरिक्त कार्यभार आमगांव, यांचे मार्गदर्शनात श्री. बाबासाहेब बोरसे, पोलीस निरीक्षक, पो.स्टे. सालेकसा, चापोना रितेश अग्नीहोत्री, पो.शि. जितेंद्र पगरवार, मपोशि प्रिती उके तसेच नक्षल प्रोपोगंडा सेल, गोंदिया येथील पो. उप. नि श्री श्रीकांत हत्तीमारे, पोहवा लियोनार्ड माँर्टीन, पो.शि.भास्कर हरिणखेडे, यांनी परिश्रम मेहनत घेवून विशेष योगदान दिले आहे.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com