तासपत्ते जुगार खेळणाऱ्या ६ इसमाविरूद्ध गोंदिया स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई करून नोंद ५६,०३०/- रूपयांचा मुद्देमाल केला जप्त…

0
Spread the love

उपसंपादक-रणजित मस्के

गोंदिया :-🔸 पोलीस अधीक्षक श्री. निखिल पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक श्री. नित्यानंद झा, यांनी जिल्ह्यांतील सर्व पोलीस ठाणे हद्दीतील अवैध धंद्यावर कारवाई करण्याचे निर्देश स्थानिक गुन्हे शाखेस दिले होते…

🔸 मा. वरिष्ठांचे निर्देश सूचना प्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाद्वारे जिल्ह्यातील अवैध धंदया विरूद्ध धाड मोहीम राबवून प्रभावी कारवाई करण्यात येत आहे…………या अनुषंगाने दिनांक-18-12-2023 रोजी मिळालेल्या गुप्त माहीतीच्या आधारे स्था. गुन्हे शाखेच्या पथकाने 18.05 वा. च्या सुमारास मौजा – धावडीटोला झुडपी जंगल परिसरात धाड कारवाई केली असता 52 तासपत्यावर पैशांची बाजी लावून हारजीतचा जुगार खेळ खेळणाऱ्या 06 इसमांना मोठ्या शिताफीने ताब्यात घेण्यात आले… तासपत्त्यावर जुगार खेळ खेळणाऱ्या इसमांच्या ताब्यातून 52 तासपत्ते किंमती 30/-रु , रोख रक्कम- 19000/- रुपये,विविध कंपनीचे 05 मोबाईल हँडसेट किमती – 37,000/- रु असा एकुण किमती – 56,030/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे….. याबाबत पो. स्टे. आमगाव येथे ताब्यात घेतलेल्या खालील नमूद 06 आरोपीं विरोधात कलम 12(अ) महाराष्ट्र जुगार कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. आरोपींची नावे खालील प्रमाणे–

1) प्रमोद तुकाराम चांदेकर वय-37 रा. वार्ड क्र.3 खमारी तालुका- जि. गोंदिया

2) वामन मुकुंदराव राऊत वय-46 वर्षे रा. तिगाव, ता. आमगाव जि. गोंदिया

3) सुनिल लक्ष्मण राऊत वय-35 वर्ष रा. मढौ चौक, श्रीनगर गोंदिया

4) सतिश गणपत येटरे वय-35 वर्षे रा. सालेकसा ता. सालेकसा जि. गोंदिया

5) धर्मेन्द्र उत्तम शिवणकर वय-32 वर्ष रा. सुपलिपार ता. आमगाव जि. गोंदिया

6) उमेश ज्ञानेश्वर बोपचे वय-29 वर्षे रा.सुपलिपार ता. आमगाव जि.गोंदिया अशी आहेत…

        🔸 मा. वरिष्ठांच्या निर्देश सूचना प्रमाणे आणि मार्गदर्शनाखाली सदरची कामगिरी पो. नि. दिनेश लबडे, स्था.गु. शा. यांचे नेतृत्वात पो.उप.नि. महेश विघ्ने, पो.हवा.चेतन पटले, सोमेंद्र तुरकर,रियाज शेख, इंद्रजित बिसेन, दिक्षित दमाहे,धनंजय शेंडे, पो.शि. संतोष केदार, यांनी केलेली आहे.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट