गोंदिया जिल्हा पोलीस प्रशासनाची धोकादायक गुंड यासीन शेखवर “M.P.D.A.” कायद्यान्वये स्थानबद्धतेची कारवाई

सह संपादक -रणजित मस्के
गोंदिया
जिल्हाधिकारी, तथा जिल्हादंडाधिकारी, मा. श्री. प्रजित नायर, यांचे दिनांक- 28 मार्च 2025 रोजीचे एम.पी. डी.ए. (महाराष्ट्र प्रिवेंशन ऑफ डेंजरस ॲक्टिव्हिटी) कायद्यान्वये कारवाईचे स्थानबध्दतेचे आदेश..
🔴 पोलीस ठाणे- गोंदिया शहर हद्दीतील धोकादायक गुंड ईसंम नामे- यासीन सलीम शेख वय 32 वर्षे राहणार- पंचायत समिती कॉलनी, गोंदिया,तालुका जिल्हा गोंदिया यास एका वर्षाकरीता मध्यवर्ती कारागृह अकोला, जिल्हा-अकोला येथे केले स्थानबद्ध-
⏩ आगामी काळात साजरे होणारे सन उत्सव तसेच जिल्ह्यांतील कायदा व सुव्यवस्था, शांतता अबाधित राहावी गुन्हेगारावर वचक बसावा म्हणून पोलीस अधीक्षक गोंदिया मा. श्री. गोरख भामरे, अप्पर पोलीस अधीक्षक श्री. नित्यानंद झा, यांनी सार्वजनिक शांतता, कायदा व सुव्यवस्था भंग करणाऱ्या गुन्हेगारांवर आणि वाढत्या गुन्हेगारीवर लगाम घालण्यासाठी धोकादायक गुंड प्रवृत्तीच्या गुन्हेगार व्यक्तीवर MPDA (महाराष्ट्र प्रिवेंशन ऑफ डेंजरस ॲक्टिव्हिटी) कायद्यान्वये कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत..
या अनुषंगाने मा. वरिष्ठांचे निर्देशाप्रमाणे पोलीस ठाणे गोंदिया शहरचे पोलीस निरीक्षक श्री. किशोर पर्वते यांनी पो.ठाणे- गोंदिया शहर हद्दीतील पंचायत समिती येथील राहणारा धोकादायक गुंड ईसंम नामे- यासीन उर्फ यासीम उर्फ बाबू वलद समीम उर्फ सलीम शेख वय 32 वर्ष राहणार- पंचायत समिती कॉलोनी, गोंदिया, तालुका जिल्हा - गोंदिया याचेविरुद्ध *एम. पी. डी. ए. (महाराष्ट्र प्रिवेंशन ऑफ डेंजरस ॲक्टिव्हिटी) कायद्यानुसार प्रस्ताव उपविभागीय पोलीस अधिकारी, उपविभाग गोंदिया श्रीमती रोहिणी बानकर मॅडम, तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी, उपविभाग तिरोडा श्री साहिल झरकर यांचे मार्फतीने मा. पोलीस अधीक्षक गोंदिया यांना प्रस्ताव पाठवण्यात आलेला होता..... आणि सदरचा MPDA प्रस्ताव पोलीस अधीक्षक कार्यालय, गोंदिया येथील प्रतिबंधक सेल द्वारे तयार करून मा. पोलीस अधीक्षक गोंदिया श्री. गोरख भामरे, यांचे शिफारस मार्फतीने मा. जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी, गोंदिया यांना मंजुरी करीता सादर करण्यात आले होते..
❇️ मा. जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी गोंदिया श्री. प्रजित नायर, यांनी प्रस्तावातील नमूद सराईत धोकादायक गुंडा इसमाविरूद्ध एम. पी. डी. ए. (महाराष्ट्र प्रिवेंशन ऑफ डेंजरस ॲक्टिव्हिटी) कायद्याचे कलम 3(1) अन्वये दिनांक- 28/03/2025 रोजी चे आदेश्यान्वये स्थानबद्धतेचा प्रस्ताव मंजूर केलेला आहे…
🔴 एम. पी. डी. ए.(MPDA) कायद्या अंतर्गत गोंदिया जिल्ह्यातील पोलीस स्टेशन- गोंदिया शहर हद्दीतील अट्टल सराईत धोकादायक गुंड ईसंम नामे- यासीन सलीम शेख याच्याविरुद्ध MPDA कायादयाअंतर्गत स्थानबध्दते ची कारवाई करण्यात आलेली आहे..दिनांक- 04/04/2025 रोजी नमूद गुन्हेगारास *जिल्हा मध्यवर्ती कारागृह अकोला जिल्हा- अकोला येथे एका वर्षाकरीता दाखल, स्थानबद्ध करण्यात आले आहे..
🔴 नामे- यासीन ऊर्फ बाबु सलीम शेख वय 32 वर्ष राहणार पंचायत समिती कॉलोनी, गोंदिया, या धोकादायक गुंडाविरूध्द*
दखलपात्र अशा गंभीर गुन्ह्यांची नोंद असून त्यात अवैधरीत्या शस्त्र बाळगणे खून करणे, चाकूचा धाक दाखवणे, चाकूनी मारहाण करणे, गैर कायद्याची मंडळी जमा करून मारहाण करणे, खूनाचा प्रयत्न करणे, लोकांमध्ये दहशत पसरविणे, यासारख्या गंभीर गुन्ह्याची नोंद आहे….त्याचेवर वारंवार कारवाई करून सुद्धा त्याचे चारित्रात वागणुकीत कोणतीही प्रकारची सुधारणा बदल झालेला नाही… त्याचे वागण्यामुळे त्याचे अवैध कृतीमुळे जनसामान्य लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
⏩ सदरची कारवाई पोलीस अधीक्षक गोंदिया मा. श्री. गोरख भामरे, अप्पर पोलीस अधीक्षक श्री. नित्यानंद झा, यांचे निर्देशाप्रमाणे उपविभागीय पोलीस अधिकारी, उपविभाग गोंदिया श्रीमती रोहिणी बानकर मॅडम, उपविभागीय पोलीस अधिकारी, तिरोडा श्री साहिल झरकर, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गोंदिया शहर श्री. किशोर पर्वते, पो.नि. स्था.गु. शा. श्री. दिनेश लबडे, यांचे मार्गदर्शनात सपोनि धीरज राजूरकर तसेच प्रतिबंधक सेल चे म.पो.उप.नि. वनिता सायकर, पोलीस अंमलदार प्रकाश गायधने, दुर्गेश तिवारी यांनी व पोलीस ठाणे गोंदिया शहर चे सपोनी संजय तुपे, अंमलदार कवलपालसिंग भाटिया, निशिकांत लोदासे, दिनेश बिसेन तसेच गुन्हे प्रकटीकरण पथक गोंदिया शहर यांनी कार्यवाही पार पाडली...
🔴 काय आहे (MPDA) एम.पी.डी.ए. कायदा?👇
👉 महाराष्ट्र झोपडपट्टी दादा, हातभट्टीवाले, औषधी द्रव्य विषयक गुन्हेगार व धोकादायक व्यक्ती, दृक्श्राव्य कलाकृतीचे विना परवाना प्रदर्शन करणाऱ्या व्यक्ती, अवैध वाळू तस्करी करणारे, जीवनावश्यक वस्तूंचा काळा बाजार करणाऱ्या व्यक्तींच्या विघातक कृत्यास आळा घालण्या बाबत अधिनियम-1981 म्हणजेच एम पी. डी. ए. कायदा (महाराष्ट्र प्रिवेंशन ऑफ डेंजरस अँक्टिविटी) होय…. सराईत गुन्हेगार किंवा सार्वजनिक कायदा व सुव्यवस्था भंग करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीविरुद्ध एम. पी. डी.ए. ची कारवाई करता येते… या कायद्यानुसार सराईत गुन्हेगाराला एक वर्षासाठी कारागृहात स्थानबद्ध करण्यात येते….
जिल्हा पोलीस प्रशासनातर्फे सराईत गुन्हेगारांवर करण्यात येत असलेल्या एम.पी.डी.ए कारवाईमुळे गुन्हेगारांमध्ये खळबळ माजली असून त्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत...