गोंदिया जिल्हा “पोलीस दादालोरा खिडकी योजना” अंतर्गत “निशुल्क भव्य मोफत कृत्रिम अवयव शिबिराचे आयोजन…!








सह संपादक- रणजित मस्के
गोंदिया ;
पोलीस दादालोरा खिडकी योजना अंतर्गत गोंदिया जिल्हा पोलीस दल द्वारा आयोजित रोटरी इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट 3030, रोटरी क्लब ऑफ नागपूर डाऊन टाऊन, व महावीर सेवा सदन आणि ह्युमॅनिटी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने अति संवेदनशील नक्षलग्रस्त भागातील जनतेच्या कल्याणाकरिता कायम अग्रेसर राहून विविध कल्याणकारी नाविन्यपूर्ण उपक्रम वेळोवेळी राबविण्यात येत असतात त्याच्याच एक भाग म्हणून मा. श्री. गोरख भामरे पोलीस अधीक्षक, गोंदिया यांच्या संकल्पनेतून व मा. श्री नित्यानंद झा, अप्पर पोलीस अधीक्षक, गोंदिया कॅम्प् देवरी, यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील दुर्गम व अतिदुर्गम भागातील गरजू दिव्यांग व्यक्तींना कृत्रिम हात व पाय लावून त्यांच्या साह्याने त्यांना समाजात वावरता यावं या दृष्टीने दिनांक 15 मार्च 2025 रोजी गरजू दिव्यांग व्यक्ती करिता 3 दिवसीय निशुल्क भव्य मोफत कृत्रिम अवयव शिबिराचे आयोजन पोलीस मुख्यालय कारंजा, गोंदिया येथील "प्रेरणा हॉल" येथे करण्यात आले आहे.
सदर आयोजित जयपुर कृत्रिम फुट शिबिराकरिता जिल्ह्यातील 85 गरजू दिव्यांग व्यक्तीनी नावाची नोंदणी केलेली असून दिनांक 15 मार्च 2025 रोजी 26 दिव्यांग व्यक्तींना हात व पाय कृत्रिम अवयव लावण्यात आलेले आहेत....सदरचे शिबिर हे दिनांक 16 मार्च 2025 ते 17 मार्च 2025 पर्यंत पोलीस मुख्यालय गोंदिया प्रेरणा हॉल येथे चालू राहणार असून उर्वरित 60 दिव्यांग व्यक्तींना कृत्रिम अवयव लावून देण्यात येणार आहे.
सदर कार्यक्रमाला मा. श्री गोरख भामरे, पोलीस अधीक्षक गोंदिया आणि वेल्फीअर कमिटी नॅशनल डिस्ट्रिक्ट 3030 चे चेअरमन राजीव वरबे, रोटरी क्लब ऑफ नागपूर डाऊन टाउन चे सेक्रेटरी श्रीमती मृदुला सुदामे आणि डायरेक्टर श्रीमती दिपाली दोडके, माऊली सेवा मित्र मंडळाचे अध्यक्ष श्री सुहाष खरे, महावीर सेवा सदन आणि इंडिया ह्युमालिटी फाउंडेशन चे डॉक्टर एस. एस. प्रभाकर प्रामुख्याने उपस्थित होते.
सदरचे निशुल्क भव्य मोफत कृत्रिम अवयव शिबिर आयोजित करण्यामध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी, उपविभाग देवरी श्री. विवेक पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी, उपविभाग आमगाव श्री.प्रमोद मडामे आणि नक्षल प्रोपोगंडा सेल गोंदिया चे प्रभारी अधिकारी व अंमलदार यांनी मोलाची कामगिरी केलेली आहे.