गोंदिया जिल्हा पोलीस दलाचे पुढाकाराने दिव्यांग व्यक्तींकरीता जयपुर फुट- मोफत कृत्रिम अवयव शिबीर..

0
Spread the love

.सह संपादक- रणजित मस्के

गोंदिया ; पोलीस मुख्यालय, कारंजा, गोंदिया येथे दि. १५/०३/२०२५ ते १७/०३/२०२५ पर्यंत जिल्हा पोलीस प्रशासनाच्या वतीने जिल्हयातील* *दिव्यांग व्यक्तींकरीता ” जयपुर फुट- मोफत कृत्रिम अवयव शिबीर”* आयोजित करण्यात येत असुन जिल्हयातील जास्तीत-जास्त गरजु दिव्यांग व्यक्तींनी सदर शिबीराचा लाभ घेण्याचे आवाहन गोंदिया जिल्हा पोलीस प्रशासनातर्फे करण्यात येत आहे.गोंदिया जिल्हा हा नक्षल प्रभावित जिल्हा असुन गोंदिया जिल्हा पोलीस दलातर्फे जिल्हयातील जनतेच्या हिताकरीता (विशेषतः नक्षलग्रस्त भागातील जनतेच्या कल्याणाकरीता) कायम अग्रेसर राहुन विविध कल्याणकारी नाविण्यपूर्ण उपक्रम वेळोवेळी राबविण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणुन मा. श्री. गोरख भामरे, पोलीस अधीक्षक गोंदिया यांच्या संकल्पनेतुन आणि मा. श्री. नित्यानंद झा, अपर पोलीस अधीक्षक, गोंदिया (कॅम्प- देवरी) यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हयातील दुर्गम, अति-दुर्गम भागातील गोर-गरीब, तसेच आदिवासी दिव्यांग व्यक्तींकरीता “जयपुर फुट- मोफत कृत्रिम अवयव शिबीर” चे आयोजन करण्यात आले आहे. सदरचे शिबीर गोंदिया जिल्हा पोलीस दल, महाविर सेवासदन, अनवी इंडिया हयूमॅनिटी फाऊंडेशन, रोटरी इंटरनेशनल डिस्ट्रिक्ट ३०३०, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने *दिनांक १५/०३/२०२५ ते १७/०३/२०२५ असे तिन* दिवस सकाळी ११.०० वा ते १७.०० वा पर्यंत पोलीस मुख्यालय, कारंजा, गोंदिया येथे संपन्न होणार आहे.करीता गोंदिया जिल्हयातील जास्तीत जास्त दिव्यांग व्यक्तींनी सदर निःशुल्क जयपुर फुट- कृत्रिम अवयव शिबीराचा लाभ घेण्याचे आवाहन मा. श्री. गोरख भामरे, पोलीस अधीक्षक गोंदिया, रोटरी डिस्ट्रीक्ट ३०३० चे गव्हर्नर श्री. रांजीदर खुराणा, चेअरमन श्री. राजीव वरभे, यांनी केले आहे.*नोंदणी व अधिक माहिती करीता खालील अंमलदार यांचेशी संपर्क साधावे :-* *१) मपोहवा चेतना कटरे,* नक्षल सेल गोंदिया – *९६७३३९२७४६* *२) पो. अंमलदार भाष्कर हरिणखेडे,* नक्षल सेल गोंदिया – *८९९९६२४२८१*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट