गोंदिया जिल्हा “पोलीस दादालोरा खिडकी योजना” “एक हाथ मदतीचा योजने अंतर्गत” स्तुत्य उपक्रम ज्ञानदीप अभ्यासिका वास्तूचे नूतनीकरण व लोकार्पण सोहळा संपन्न…

0
WhatsApp Image 2025-04-19 at 1.44.16 PM
Spread the love

सह संपादक – रणजित मस्के

गोंदिया

🔹…. पोलीस अधीक्षक गोंदिया मा. श्री. गोरख भामरे, यांचे संकल्पनेतून तसेच अप्पर पोलीस अधीक्षक श्री. नित्यानंद झा, यांचे मार्गदर्शनाखाली गोंदिया जिल्हा पोलीस दलातर्फे जिल्ह्यातील नक्षल प्रभावित दुर्गम- अतिदुर्गम भागांतील जनतेकरिता विशेषतः ग्रामीण भागातील होतकरू विद्यार्थी युवक -युवती यांच्या विकासासाठी, आणि त्यांच्या भवितव्यासाठी “पोलीस दादालोरा एक खिडकी योजना एक हाथ मदतीचा” या योजणेअंतर्गत विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले जात आहेत.

     याचाच एक भाग म्हणून मा. गोरख भामरे, पोलीस अधीक्षक गोंदिया, मा. नित्यानंद झा अप्पर पोलीस अधीक्षक,  गोंदिया, मा. विवेक पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी, देवरी यांच्या संकल्पनेतून व प्रेरनेने मान्यवरांच्या  उपस्थितीत दि  17/04/2025 रोजी गोंदिया जिल्हा पोलीस दलातर्फे संचलित पोलीस उप मुख्यालय देवरी येथे सर्व सोयी सुविधायुक्त, सुसज्ज अशा "ज्ञानदीप अभ्यासिकेचे" नुतनीकरण व "सब्सीडरी कॅन्टीनचे" उद्घाटन सोहळा उत्साहात पार पाडण्यात आले....

 या सोहळ्याचे उद्घाटन माननीय श्री. गोरख भामरे, पोलीस अधीक्षक, गोंदिया यांच्या हस्ते व मा. श्री. नित्यानंद झा,अपर पोलीस अधीक्षक, गोंदिया तसेच मा. श्री. विवेक पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी, देवरी यांच्या उपस्थित पार पडला.

      विद्यार्थ्यांना शांत, सुरक्षित आणि प्रेरणादायी अभ्यासाचे वातावरण मिळावे, या उद्देशाने गोंदिया जिल्हा पोलीस दलाच्या वतीने "दादालोरा खिडकी"  योजने अंतर्गत ही अभ्यासिका सुरु करण्यात आली आहे. अभ्यासिकेमध्ये वाचनासाठी आवश्यक पुस्तक संपदा, प्रशस्त बैठक व्यवस्था, पंखे, लाईट्स यांची पुरेशी सोय करण्यात आली आहे.

      उद्घाटनप्रसंगी बोलताना पोलीस अधीक्षक, मा. श्री गोरख भामरे, यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अशा अभ्यासिकांचे महत्त्व अधोरेखित केले. व पुढील काळातही अभ्यासिकेतील विद्यार्थ्यांना आवश्यक त्या सर्व सोयी सुविधा पुरविण्याचे आश्वासन दिले. तसेच मा. नित्यानंद झा, अपर पोलीस अधीक्षक, कॅम्प देवरी यांनी, सदर ज्ञानदीप अभ्यासिकेचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घेऊन उपलब्ध वेळेचा योग्य प्रकारे नियोजन करून यश संपादन करण्याबाबत उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.......त्याचप्रमाणे दादालोरा खिडकी योजने अंतर्गत चालविण्यात येणाऱ्या पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण मध्ये लेखी परिक्षा व शारीरिक चाचणी तसेच नियमीत सराव परीक्षा अशी परिपूर्ण तयारी करून घेत असल्याने ग्रामीण भागातील होतकरू विद्यार्थ्यांना लाभ होत असल्याचे विद्यार्थी सौरभ लेंडे व मयुरी गावड या प्रशिक्षणार्थीनी आपले मनोगतात व्यक्त केले.तसेच प्रशिक्षणार्थ्यांना मार्गदर्शन करणारे सपोनी बस्तवाडे, पोलीस हवालदार डोईफडे, नेवारे, गावळ, वसीम पठाण ,पोशि विवेक साखरवाडे,गणवीर,चांदेवार यांचा माननीय वरिष्ठांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

  या कार्यक्रमाला पोलीस दलातील पोलीस अधिकारी, अंमलदार तसेच अभ्यासिकेतील 35 विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते......सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सपोनि. अजित पाटील, कार्यक्रमाचे प्रास्ताविक सपोनि.राजू बस्तवाडे, कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन पोउपनि.रंजित मट्टामी यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट