गोंदिया जिल्हा पोलीस प्रशासनाची अवैध गौण खनिज (रेती) चोरी/ वाहतुक करणारे इसम व वाहनांवरधडक कारवाई..

0
WhatsApp Image 2025-01-25 at 8.41.27 PM
Spread the love

सह संपादक- रणजित मस्के

गोंदिया ;

दिनांक- 12.01.2025 ते 25.01.2025 रोजी दरम्यान कारवाईचा दणका..!

किंमती एकूण – 4,87,86,000/- ( चार कोटी सत्यांशी लक्ष , छ्यांशी हजार ) रूपयांचा मुद्देमाल जप्त– गुन्हे नोंद
⏩ पोलीस अधीक्षक गोंदिया मा. श्री. गोरख भामरे, अप्पर पोलीस अधीक्षक श्री. नित्यानंद झा, यांनी गोंदिया जिल्ह्यात शासनाला महसूल न भरता, विना परवाना अवैधरित्या रेतीचे उत्खनन, चोरी, आणि वाहतूक करणाऱ्याविरुध्द प्रभावी धाड टाकून कारवाई करण्याचे निर्देश सूचना देवून सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना याबाबत आदेशित केले होते.

या अनुषंगाने दिनांक 12.01.2025 ते 25.01.2025 रोजी दरम्यान संपुर्ण जिल्हा स्तरावर “ऑपरेशन फ्लश ऑऊट” मोहीम राबविण्यात आली…सदर मोहिमेअंतर्गत जिल्हयात गौण खनिज बाबत शासनाला कोणत्याही प्रकारचा महसुल न भरता विना रॉयल्टी, विना परवाना बेकायदेशिररीत्या रेती वाहतुक करणारे इसम व वाहनावर पोलीस अधीकारी व पोलीस अंमलदार यांनी पेट्रोलींग दरम्यान गोपनिय माहीतीच्या आधारे कारवाई करून रेती व वाहने जप्त करण्यात आले असून पोलीस ठाणे तिरोडा एकूण 3 कारवाई, पोलीस ठाणे आमगाव एकूण 8 कारवाई, पोलीस ठाणे अर्जुनी/ मोरगाव एकूण 1 कारवाई, पोलीस ठाणे देवरी एकूण 2 कारवाई, पोलीस ठाणे दवणीवाडा एकूण 2 कारवाई, पोलीस ठाणे डूग्गीपार एकूण 1 कारवाई, याप्रमाणे पंधरवाड्यात एकूण- 17 कारवाया करून एकूण 42 आरोपी यांचे विरूध्द पो.ठाण्यास गुन्हे नोंदविण्यात आले असुन 7 पोकलेन,4 टिप्पर, 17 ट्रॅक्टर, 24 ब्रॉस रेती, असा किंमती एकूण – 4,87,86,000/- ( चार कोटी सत्यांशी लक्ष , छ्यांशी हजार ) रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट