गोंदिया जिल्हा पोलीस प्रशासनाची धोकादायक गुंडाविरुद्ध “MPDA” कायद्यान्वये स्थानबद्धतेची सलग 6 वी कारवाई…

0
Spread the love

उपसंपादक-रणजित मस्के

गोंदिया :- जिल्हाधिकारी, तथा जिल्हादंडाधिकारी, मा. श्री. प्रजित नायर, यांचे दिनांक- 26 सप्टेंबर 2024 रोजीचे एम.पी. डी.ए. (महाराष्ट्र प्रिवेंशन ऑफ डेंजरस ॲक्टिव्हिटी) कायद्यान्वये कारवाईचे स्थानबध्दतेचे आदेश..*

🔴 पोलीस ठाणे- रामनगर, गोंदिया हद्दीतील धोकादायक गुंड ईसंम नामे- पंकज उर्फ मोनु गोविंद अग्रवाल वय 36 वर्षे राहणार- बसंतनगर, गोंदिया, तालुका- जिल्हा- गोंदिया यास एका वर्षाकरीता मध्यवर्ती कारागृह चंद्रपूर, जिल्हा चंद्रपूर येथे केले स्थानबद्ध-

⏩ याबाबत थोडक्यात माहिती अशी की, आगामी नवरात्रोत्सव सन व होणारी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गोंदिया जिल्ह्यांतील कायदा व सुव्यवस्था, शांतता अबाधित राहावी म्हणून पोलीस अधीक्षक गोंदिया मा. श्री. गोरख भामरे, अप्पर पोलीस अधीक्षक श्री. नित्यानंद झा, यांनी जिल्ह्यातील सार्वजनिक शांतता, कायदा व सुव्यवस्था भंग करणाऱ्या गुन्हेगारांवर आणि वाढत्या गुन्हेगारीवर लगाम घालण्यासाठी धोकादायक गुंड प्रवृत्तीच्या गुन्हेगार व्यक्तीवर MPDA (महाराष्ट्र प्रिवेंशन ऑफ डेंजरस ॲक्टिव्हिटी) कायद्यान्वये कारवाई करण्याचे निर्देश दिले होते…

त्या अनुषंगाने मा. वरिष्ठांचे निर्देशाप्रमाणे पोलीस निरीक्षक, प्रविण बोरकुटे, पोलीस ठाणे रामनगर यांनी पो. ठाणे- रामनगर हद्दीतील धोकादायक गुंड ईसंम नामे- पंकज उर्फ मोनु गोविंद अग्रवाल वय 33 वर्षे राहणार- बसंत नगर, गोंदिया, तालुका- जिल्हा- गोंदिया गोंदिया* याचेविरुद्ध एमपीडीए. (महाराष्ट्र प्रिवेंशन ऑफ डेंजरस ॲक्टिव्हिटी) कायद्यानुसार चा प्रस्ताव उपविभागीय पोलीस अधिकारी, उपविभाग गोंदिया श्रीमती रोहिणी बानकर मॅडम यांचे मार्फतीने मा. पोलीस अधीक्षक गोंदिया यांना पाठवला होता….. आणि सदरचा MPDA प्रस्ताव पोलीस अधीक्षक कार्यालय, गोंदिया येथील प्रतिबंधक सेल द्वारे तयार करून मा. पोलीस अधीक्षक गोंदिया श्री. गोरख भामरे, यांचे मार्फतीने मा. जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी, गोंदिया यांना मंजुरी करीता सादर करण्यात आले होते.

❇️ जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी गोंदिया मा. श्री. प्रजित नायर, यांनी प्रस्तावातील नमूद सराईत धोकादायक गुंडा इसमा विरूद्ध एम.पी.डी.ए. (महाराष्ट्र प्रिवेंशन ऑफ डेंजरस ॲक्टिव्हिटी) कायद्याचे कलम 3(1) अन्वये दिनांक- 26/09/2024 रोजीचे आदेश्यान्वये स्थानबद्धतेचा प्रस्ताव मंजूर केलेला आहे…

🔴 एम.पी.डी.ए.(MPDA) कायद्या अंतर्गत गोंदिया जिल्ह्यातील पोलीस स्टेशन- रामनगर हद्दीतील अट्टल सराईत धोकादायक गुंड ईसंम नामे – पंकज उर्फ मोनु गोविंद अग्रवाल वय 36 वर्षे, राहणार- बसंत नगर, गोंदिया, तालुका- जिल्हा- गोंदिया याच्याविरुद्ध MPDA कायादया अंतर्गत स्थानबध्दतेची कारवाई करण्यात आलेली आहे… दिनांक- 28/09/2024 रोजी नमूद गुन्हेगारास मध्यवर्ती कारागृह चंद्रपूर जिल्हा – चंद्रपूर येथे एका वर्षाकरीता दाखल करण्यात आले असून……. स्थानबद्ध करण्यात आले आहे..

🔴 पंकज उर्फ मोनु गोविंद अग्रवाल या धोकादायक गुंडाविरूध्द गोंदिया जिल्ह्यातील रामनगर, रावणवाडी, दवनीवाडा, डूग्गीपार अश्या पोलीस ठाण्यास विविध 14 गंभीर गुन्ह्याची नोंद असुन त्यामध्ये प्रामुख्याने – खून करणे, खोटे दस्ताऐवज तयार करुन ठगबाजी करणे, शासकीय कामकाजात उपयोगी येणारे नकली मोहरे बनविणे, चोरी करणे, अवैध उत्खनन करुन रेती चोरी करणे, अवैद्यरित्या गांजा बाळगणे, गांजा विक्री करणे, दरोडा घालणे, खंडणी मागणे, अवैद्यरित्या शस्त्र बाळगणे, अवैध शस्त्र पुरविणे, ईत्यादी प्रकारचे अनेक गंभीर गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत.

⏩ पोलीस अधीक्षक गोंदिया मा. श्री. गोरख भामरे, अप्पर पोलीस अधीक्षक श्री. नित्यानंद झा, यांचे निर्देशाप्रमाणे उपविभागीय पोलीस अधिकारी, उपविभाग गोंदिया श्रीमती रोहिणी बानकर मॅडम, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री. दिनेश लबडे, स्था.गु. शा. यांचे मार्गदर्शनात प्रतिबंधक सेल चे म.पो.उप.नि. वनिता सायकर, आणि पोलीस अंमलदार प्रकाश गायधने, दुर्गेश तिवारी यांनी व पोलीस ठाणे रामनगर चे पोलीस निरीक्षक श्री. प्रविण बोरकुटे, यांचे मार्गदर्शनात पो.अंमलदार राजु भगत तसेच रामनगर गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलीस अंमलदार, तसेच सायबर सेल येथील पोलीस अंमलदार यांनी कार्यवाही पार पाडली..

🔴काय आहे एमपीडीए कायदा?👇
👉 महाराष्ट्र झोपडपट्टी दादा, हातभट्टीवाले, औषधी द्रव्यविषयक गुन्हेगार व धोकादायक व्यक्ती, दृक्श्राव्य कलाकृतीचे विनापरवाना प्रदर्शन करणाऱ्या व्यक्ती, अवैध वाळू तस्करी करणारे, जीवनावश्यक वस्तूंचा काळा बाजार करणाऱ्या व्यक्तींच्या विघातक कृत्यास आळा घालण्या बाबत अधिनियम 1981 म्हणजेच एम पी. डी. ए. कायदा (महाराष्ट्र प्रिवेंशन ऑफ डेंजरस अँक्टिविटी) होय…. सराईत गुन्हेगार किंवा सार्वजनिक कायदा व सुव्यवस्था भंग करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीविरुद्ध एम. पी. डी.ए. ची कारवाई करता येते… या कायद्यानुसार सराईत गुन्हेगाराला एक वर्षासाठी कारागृहात स्थानबद्ध करण्यात येते.

जिल्हा पोलीस प्रशासनातर्फे सराईत गुन्हेगारांवर करण्यात येत असलेल्या एम.पी.डी.ए कारवाईमुळे गुन्हेगारांमध्ये खळबळ माजली असून त्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट