गोंदिया जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी मा. श्री. प्रजित नायर, यांचे दिनांक 28 मार्च 2025 रोजीचे (एम. पी. डी. ए.) अंतर्गत स्थानबद्धतेचे आदेश

सह संपादक – रणजित मस्के
गोंदिया
छोटा गोंदिया येथील कुख्यात गुंड- प्रकाश ऊर्फ पप्पु हनसलाल टेंभरे याचेवर केली एम.पी.डी.ए. अंतर्गत कारवाई
( एक वर्षाकरीता यवतमाळ जिल्हा कारागृहात केले स्थानबध्द )
🔹 पोलीस ठाणे गोंदिया शहर हद्दीतील कुख्यात गुंड प्रकाश ऊर्फ पप्पु हनसलाल टेंभरे, वय ३० वर्षे, रा. जितेश चौक, छोटा गोंदिया याचेविरुध्द पोलीस ठाणे गोंदिया शहर येथे सन २०१२ पासून दरोडा, मृत्यु किंवा जबर दुखापत घडवुन आणण्याच्या प्रयत्नासहित जबरी चोरी किंवा दरोडा, सामाईक इरादयाने इच्छापुर्वक जबर दुखापत करणे, दुखापत, धमकी देणे, गैरकायद्याची मंडळी जमवून नासधूस करणे, तडीपार असताना सुध्दा परवानगीविना प्रवेश करणे, लोकसेवक सार्वजनीक कार्य पार पाडत असतांना बेकायदेशीर जमावाचा घटक बनून त्याला अटकाव करणे, शिवीगाळ करून धमकी देणे, गैरनिरोध करण्याची पूर्व तयारी करून गृह अतिक्रमण करणे, खंडणी करीता अपहरण करणे, जिवाने ठार मारण्याचा प्रयत्न करणे, सार्वजनीक ठिकाणी दागुच्या नशेत शांतता भंग करणे, महाराष्ट्र जुगार कायदा असे एकुण १५ गंभीर गुन्हे दाखल आहेत. सदर गुंडाविरुध्द वारंवार प्रतिबंधक कार्यवाही करण्यात आलेली असुन त्यास सन २०१६, २०१९ व २०२३ मध्ये गोंदिया, भंडारा व बालाघाट (म.प्र.) जिल्हयातुन तीन वेळा तडीपार सुध्दा करण्यात आले होते तरीसुध्दा त्याच्या वर्तणुकीत कोणत्याही प्रकारची सुधारणा झालेली नव्हती. त्याने कायदयाला न जुमानता गुन्हा करण्याचे व परीसरातील सार्वजनीक शांतता व सुव्यस्था भंग करणे सुरुच ठेवले होते. त्यामुळे पोलीस ठाणे गोदिया शहर येथील पोलीस निरीक्षक श्री. किशोर पर्वते यांनी मा. पोलीस अधीक्षक यांच्या निर्देशानुसार सदर गुंडाविरुध्द एम.पी.डी.ए. कायदयाअंतर्गत प्रस्ताव तयार करुन मा. पोलीस अधीक्षक गोंदिया यांचे मार्फतीने मा. जिल्हा दंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी गोंदिया यांचे कडे सादर केले होते. उपविभागीय पोलीस अधीकारी गोंदिया श्रीमती रोहीणी बानकर व उपविभागीय पोलीस अधिकारी तिरोडा श्री. साहील झारकर यांनी, नमुद गुंडाच्या परिसरात असलेल्या दहशतीबाबत शहानिशा करून त्यांनीसुध्दा त्यांचा अहवाल सादर केलेला होता.. मा. जिल्हा दंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी गोंदिया यांनी पोलीस निरीक्षक यांनी पाठवीलेल्या प्रस्तावाची शहानिशा करून व सदर गुंडाची परिसरात असलेली दहशत लक्षात घेवून त्यास दि. २८/०३/२०२५ रोजी एक वर्षाकरीता एम.पी.डी.ए. कायद्याअंतर्गत जिल्हा कारागृह यवतमाळ येथे स्थानबध्द करण्याबाबत आदेश पारीत केले. त्यानुषंगाने कुख्यात गुंड प्रकाश ऊर्फ पप्पु हनसलाल टेंभरे, वय ३० वर्षे, रा. जितेश चौक, छोटा गोंदिया यास दि. ८/४/२०२५ रोजी ताब्यात घेवून त्यास जिल्हा कारागृह यवतमाळ येथे एम.पी.डी.ए. कायदयांतर्गत दाखल करण्यात आले.
सदर कारवाईमुळे पोलीस ठाणे गोंदिया शहर परिसरातील गुन्हेगारांमध्ये चांगलीच दहशत पसरली आहे. सदर कारवाईचे परिसरातील लोकांनी स्वागत केलेले आहे. पोलीस ठाणे गोंदिया शहर येथील पोलीस निरीक्षक श्री. किशोर पर्वते यांनी शहरात सार्वजनीक शांतता व सुव्यवस्था बाधीत करणाऱ्यांविरुध्द आणखी एम.पी.डी.ए. अंतर्गत कारवाई सुरु असल्याचे सांगितले.
सदरची कारवाई पोलीस अधिक्षक गोंदिया, मा.श्री. गोरख भामरे, अपर पोलीस अधिक्षक गोंदिया, श्री. नित्यानंद झा, यांचे निर्देशाप्रमाणे उपविभागीय पोलीस अधिकारी गोंदिया, श्रीमती रोहीणी बानकर, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस ठाणे गोंदिया शहरचे पोलीस निरिक्षक श्री किशोर पर्वते, स्था. गु. शा. गोंदिया येथील पोलीस निरीक्षक श्री. दिनेश लबडे, यांचे मार्गदर्शनात पो. ठाणे गोंदिया शहर येथील सपोनि वैभव गेडाम, डी. बी.पथकातील कवलपालसिंग भाटीया, सुदेश टेंभरे, निशिकांत लॉदासे, प्रमोद चव्हाण, दिपक राहांगडाले, सतिश शेंडे, दिनेश बिसेन, सुभाष सोनवाने, मुकेश राबते, अशोक राहांगडाले, प्रमोद शेंडे, सोनु नागपुरे, राकेश बंजारे तसेच स्थानिक गुन्हे शाखा गोदिया येथील प्रतिबंधक सेलचे म.पो.उप.नी. वनिता सायकर, अंमलदार पो.हवा. प्रकाश गायधने, दुर्गेश तिवारी यांनी केलेली आहे.