गोंदिया शहर पोलीसांनी घरफोडी करणाऱ्या चोरट्यास अखेर जेरबंद करून गुन्ह्यातील दागीने केेले हस्तगत…

उपसंपादक-रणजित मस्के
गोंदिया :– याबाबत थोडक्यात हकीगत अशी की, दिनांक 24/03/2024 रोजी फिर्यादी नामे – दिनेश पुरनलाल मेश्राम, रा. गौतमनगर, कायरकर लॉन चे समोर, गोंदिया हे बाहेर गावी गेले असता त्यांचे राहते घराचे समोरील लोखंडी गेट व समोरील दाराचे कुलूप तोडुन आलमारीत ठेवलेले सोन्याचे दागीने व रोख रक्कम असा एकुण 56,500/- रु…..चा मुद्देमाल अज्ञात चोराने चोरुन नेल्याने फिर्यादीचे तोंडी रिपोर्टवरून पो. स्टे. गोंदिया शहर येथे अप क्र. 201/2024 कलम 454, 457, 380 भादंवी. अन्वये अज्ञात इसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला होता…
मा. वरिष्ठांचे निर्देश सूचना मार्गदर्शनाखाली पो. नि. श्री. चंद्रकांत सुर्यवंशी, पोलीस स्टेशन गोंदिया शहर यांचे मार्गदर्शनात गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलीस अंमलदार यांनी घटनास्थळ परीसरातील सी.सी.टी.व्ही. फुटेज व गोपनिय सुत्राच्या आधारे आरोपीचा शोध घेवुन आरोपी नामे- फरहान ईशाक कुरेशी, वय 19 वर्षे, रा.गौतमनगर, बाजपेई वार्ड, गोंदिया*

याला गुन्ह्यांत ताब्यात घेवून अटक करण्यात आली..त्याचेकडे नमुद घरफोडी गुन्ह्याचे अनुषंगाने कसुन चौकशी तपास करण्यात आले… नमूद आरोपीने गुन्हा केल्याची कबुली दिल्याने त्याचेपासून गुन्ह्यात चोरीस गेलेले दागिणे मुद्देमालापैकी- सोन्याची नथ, लॉकेट, सोन्याची अंगठी, असा किंमती 28,000/- रु. व रोख रक्कम 8,000,/- असा एकुण 36,000,/- चा मुद्देमाल हस्तगत करून गुन्ह्यांत जप्त करण्यात आले आहे…सदर गुन्हयाचा तपास पोहवा कवलपालसिंग भाटीया पो. स्टे. गोंदिया शहर हे करीत आहेत.
सदरची कामगीरी मा. वरिष्ठांचे निर्देशाप्रमाणे….श्रीमती रोहीणी बानकर, मॅडम उपविभागीय पोलीस अधिकारी, उपविभाग गोंदिया यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन गोंदिया शहरचे पोलीस निरिक्षक श्री. चंद्रकांत सुर्यवंशी, गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सपोनि सोमनाथ कदम, पोहवा कवलपालसिंग भाटीया, जागेश्वर उईके, दिपक रहांगडाले, सुदेश टेंभरे, सतिश शेंडे, प्रमोद चव्हाण, निशिकांत लोंदासे, मपोहवा- रिना चौव्हाण, पोशि. दिनेश बिसेन, सुभाष सोनवाने, अशोक रहांगडाले, मुकेश रावते, कुणाल बारेवार यांनी केली.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com