गोंदिया शहर पोलीसांनी महादेव मंदीरातील दानपेटी चोरी करणा-या चोरांना अवघ्या काही तासात केले जेरबंद…

0
Spread the love

उपसंपादक-रणजित मस्के

गोंदिया :

🔸 याबाबत थोडक्यात हकीगत अशी की,दिनांक ०५/१०/२०२३ रोजी २०.०० वा. ते दिनांक ०६/१०/२०२३ रोजी ०४.०० वा. दरम्यान फिर्यादी विष्णु देवनारायण अग्रवाल, रा. विद्यानगर, गणेश नगर, गोदिया, यांचे घराशेजारी सर्वेश्वर महादेव मंदीराचे दाराचा कुलुप तोडुन मंदीरातील दानपेटी व दानपेटीतील अंदाजे १०००/- रुपये, एक पितळी धातुची समई किं. अंदाजे ५००/-, एक तांब्याची श्रींगी किं. अंदाजे ३००/- असा एकुण १८००/- रुपयाचा सामान अज्ञात चोरट्याने चोरुन घेवुन नेल्याने फिर्यादीचे तोंडी रिपोर्टवरून पो.स्टे. गोंदिया शहर येथे अपराध क्रं. ६५७ / २०२३ कलम ४५७, ३८० भा.दं.वि. अन्वये गुन्हा दाखल करण्यात आले होते.

🔸 मा. श्री निखील पिंगळे, पोलीस अधिक्षक, गोंदिया यांनी सर्व ठाणेदार यांना दिलेल्या निर्देशाप्रमाणे पोलीस स्टेशन गोंदिया शहर चे पो. नि. श्री चंद्रकांत सुर्यवंशी यांचे मार्गदर्शनात गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलीस अंमलदार यांनी अथक परिश्रमाने गोपनिय माहितीच्या आधारे संशयावरुन इसम नामे-

१) सुमित महेन्द्रसिंग चिंडाले, वय २८ वर्षे,*

२) अमित ऊर्फ गुलशन ऊर्फ अमित महेन्द्रसिंग चिंडाले, वय २३ वर्ष दोन्ही रा. बजाजवार्ड, दसखोली, गोंदिया

      यांना ताब्यात घेवुन त्यांचेकडे कौशल्यपूर्ण तपास करुन त्यांचेकडुन सर्वेश्वर महादेव मंदीरातील चोरीस गेलेली दानपेटी, रोख रक्कम नाणे व नोटा एकुण १०१०/- रुपये, एक पितळी धातुची समई किं. अंदाजे ५००/-, एक तांब्याची श्रींगी किं. अंदाजे ३००/- असा एकुण १८९०/- रुपयाचा मुद्देमाल आरोपीतांकडुन हस्तगत करुन चोरांच्या मुसक्या आवळल्या सदर गुन्हयाचा तपास सुरु असुन तपास म.पो.हवा. रिना चौव्हाण, पो.स्टे. गोंदिया शहर करीत आहेत.

   सदरची कारवाई श्री. निखील पिंगळे, पोलीस अधिक्षक, गोदिया, श्री. अशोक बनकर, अप्पर पोलीस अधिक्षक, गोदिया, श्री संकेत देवळेकर, उपविभागीय पोलीस अधिकारी, उपविभाग देवरी यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन गोंदिया शहरचे पोलीस निरीक्षक श्री. चंद्रकांत सुर्यवंशी, गुन्हे प्रकटीकरण पथकाचे स.पो.नि. सागर पाटील, पो. हवा. जागेश्वर उईके, सुदेश टेंभरे, दिपक रहांगडाले, सतिश शेंडे, प्रमोद चव्हाण, मपोहवा. रिना चौव्हाण, पो.शि.दिनेश बिसेन, मुकेश रावते, सुभाष सोनवाने यांनी केली.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट