घरफोडीतील , चोरीस गेलेले सोन्या चांदीचे दागिने, रोख रक्कम आरोपींकडून हस्तगत.. एकूण 22 हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त.. गोंदिया शहर पोलीसांची कामगिरी..

प्रतिनिधी-रणजित मस्के
गोंदिया:
याबाबत थोडक्यात हकीकत अशी की, दिनांक 13 नोव्हेबर ते 14 नोव्हेबर चे दिवसा ते मध्यरात्री चे दरम्यान पोलीस ठाणे गोंदिया शहर हद्दीतील वाजपेयी वॉर्ड येथील एका घरात अज्ञात चोरट्यांनी प्रवेश करून घरातील लाकडी कपाटात ठेवलेले सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम एकूण 25,000 हजार रुपये चा मुद्देमाल चोरून नेले. अशा तक्रारीवरून पोलीस स्टेशन गोंदिया शहर येथे गुन्हा 736/2022 कलम 454, 457, 380 भादवी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्ह्याचा आढावा घेऊन गुन्हा उघडकीस आणण्याच्या उद्देशाने पोलीस अधीक्षक श्री.निखिल पिंगळे यांनी निर्देशित करून महत्त्वाच्या सूचना दिल्या होत्या.
त्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक, गोंदिया श्री.निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक श्री. अशोक बनकर, यांचे निर्देश व आदेशान्वये , उपविभागीय पोलीस अधिकारी गोंदिया श्री. सुनील ताजने, पोलीस ठाणे गोंदिया शहर, चे पोलीस निरीक्षक श्री.चंद्रकांत सूर्यवंशी यांचे मार्गदर्शनात कारवाई करण्यात आली.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com