गोंदिया शहर पोलीसांनी हाँटेल व्यवसायीकास ठकबाजी करून गंडविणा-यास ठोकल्या बेड्या …

उपसंपादक-रणजित मस्के
गोंदिया :
🎯 याबाबत थोडक्यात हकीगत अशी की, दिनांक -०४/११/ २०२३ रोजी फिर्यादी-श्री. गोपाल प्रल्हादराय अग्रवाल, रा. गणेशनगर गोंदिया, हाँटेल राईस सिटी चे मालक यांचे मोबाईल फोनवर अनोळखी इसमाने फोन करुन फिर्यादीचे हॉटेलमध्ये एका मुलीचा अश्लील व्हीडीयो तयार केला असुन त्यामध्ये फिर्यादीचे नाव येत असल्याची भीती दाखवुन गुन्ह्याचे चार्जशीट मधुन त्यांचे नाव कमी करण्यासाठी पोलीस प्रोसेक्युटरला देण्याकरीता ६०,०००/- रु. पाठवा असे सांगुन, त्या अनोळखी इसमाने दुस-या इसमाचे मोबाईल क्रमाकावर फिर्यादीस पैसे पाठविण्यास सांगीतल्याने फिर्यादी यांनी अब्रुला घाबरुन गुन्हा दाखल नसतांना सुध्दा अनोळखी इसमाने फिर्यादीकडुन फोन-पे व्दारे ६०,००० /- रु. घेवुन फिर्यादीची फसवणुक केल्याने अनोळखी इसमाविरोधात दिनांक-०६/११/२०२३ रोजी पोलीस स्टेशन गोंदिया शहर येथे अपराध क्र. ७१९ / २०२३ कलम ४१९, ४२० भा.द.वी. अन्वये दाखल करण्यात आलेला होता.
⏩ पोलीस अधीक्षक,श्री. निखिल पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक श्री. अशोक बनकर, यांचे नमूद गुन्ह्याचे तपासाचे अनुषंगाने दिलेल्या निर्देश सूचना प्रमाणे श्री. सुनील ताजने, उपविभागीय पोलीस अधिकारी, उपविभाग, गोंदिया यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस स्टेशन गोंदिया शहर चे पो. नि. श्री. चंद्रकांत सूर्यवंशी यांचे मार्गदर्शनात गोंदिया शहर पोलीसांनी तांत्रीक विश्लेषनावरुन त्या खात्याची संपुर्ण माहीती घेवुन फिर्यादी यांनी फोन पे द्वारे अनोळखी इसमाला पाठवलेली ६०,०००/- रु. रक्कम ज्या खात्यावर जमा झाली ते खाते होल्ड करुन तपास पथक तयार करुन पथकास जिल्हा- चंद्रपुर व गडचिरोली जिल्ह्यातील आष्टी येथे पाठविण्यात आले होते. आरोपीत ईसम नामे----
१) चंदन दिगुराम सांगरे वय २८ रा. जय गुरुनगर आष्टी ता. चामोर्शी जि. गडचिरोली
(२) रवी मारोती मंचावार वय – ५३ वर्ष रा. दाताडा रोड चंद्रपुर
यांना ताब्यात घेवुन नमूद गुन्ह्यात दिनांक- ०८/११ / २०२३ रोजी अटक करण्यात आलेली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीतांना विश्वासात घेऊन गून्ह्या संबंधाने विचारपूस केली असता नमूद आरोपीतांनी गोंदिया जिल्हा व इतर जिल्ह्यातील हॉटेल व्यवसायीकांची अशाच प्रकारे फसवणुक केल्याचे तपासा दरम्यान सांगितले आहे... सदर गुन्हयाचा अधिकचा सखोल तपास पो. उप.नी मंगेश वानखडे हे करीत आहेत...
🔹 सदरची कारवाई मा. वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन गोंदिया शहरचे पोलीस निरीक्षक श्री. चंद्रकांत सुर्यवंशी, गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सपोनि. सागर पाटील, पो. उपनी. मंगेश वानखडे, पो. हवा. जागेश्वर उईके, सुदेश टेंभरे, सतिश शेंडे, दिपक रंहागडाले, प्रमोद चव्हाण, म.पो.हवा. रिना चव्हाण, श्याम कोरे, पो.शि. दिनेश बिसेन, कुणाल बारेवार, सुभाष सोनवाने, विक्की रावते, अशोक राहांगडाले तसेच सायबर सेल गोंदियाचे पो.हवा. दिक्षीत दमाहे यांनी केली आहे.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com