ब्रँडेड टायटन, सोनाटा, फास्टट्रॅक, कंपनी च्या नावे बनावटी (नकली) घड्याळे विक्री करिता बाळगणाऱ्या दोघांविरूद्ध गोंदिया शहर पोलीसांची धडक कारवाई…

उपसंपादक-रणजित मस्के
गोंदिया :–
🔸याबाबत थोडक्यात हकीगत अशी की, श्री गौतम श्यामनारायण तिवारी, व्यवसाय अधिकृत प्रतिनिधी (एस.एन.जी. सालीशीटर कंपनी लिमिटेड) रा. ठी. प्लॉट नं. 6, सेक्टर 19/बी. द्वारका नवी दिल्ली असे असून यांची एस.एन. जी. सॉलिसिटर, एलएसपी नावाची लिगल फर्म आहे. सदरची कंपनी यांचे नावावर रजिस्टर असून टायटन, सोनाटा व फास्टट्रैक कंपनीचे हात घड्याळाची मालाची कोणत्याही प्रकारे कोणी नक्कल करून अश्या वस्तूचे उत्पादन व विक्री करीत असेल तर अश्यांची माहिती काढून पोलीसांचे मदतीने त्यांच्याविरुध्द कायदेशीर कारवाई करण्याचे अधिकार कंपनीद्वारे यांना दिलेले आहेत....
🔹 तक्रारदार यांना गोंदिया येथे त्यांचें अधीकृत असलेल्या कंपनी फर्मचे नावाचा वापर करून नकली, बनावटी घड्याळे विक्री करीत असल्याची खात्रीशीर माहिती प्राप्त झाल्याने त्यांनी मा. पोलीस अधीक्षक गोंदिया श्री. निखिल पिंगळे, यांना याबाबत कायदेशिर कारवाई करण्याकरिता रीतसर परवानगी मागुन पोलिसांची मदत मिळण्याकरिता विनंती केलेली होती.....
🔹 यावरून पोलीस अधीक्षक श्री. निखिल पिंगळे, यांनी पो.नि. दिनेश लबडे, स्था. गु. शा. यांना तक्रारदार यांना मदत करून कायदेशिर कारवाई करण्याच्या निर्देश सूचना दिलेल्या होत्या...........या अनुषंगाने मा. वरिष्ठांचे आदेशांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे दोन वेगवेगळे पथके तयार करण्यात आलेली होती....
🔸 तक्रारदार यांना मिळालेल्या खात्रीलायक माहितीच्या आधारे त्यांचें सोबत जावून दिनांक 22-11- 2023 रोजी चे 13.30 ते 22.00 वाजता दरम्यान कारवाई केली असता......... कुडवा लाईन गोंदिया येथील 1)ग्रीन वॉच आणि 2) न्यू बजाज अश्या दोन आस्थापना दुकानामध्ये टायटन, सोनाटा व फास्ट ट्रॅक कंपनीचे नावाने तसेच त्यांचे सिमबॉल लोगो चा नामांकित कंपनीचा वापर करून कंपनीची बनावटी करण (नक्कल) करून ग्राहकांना अनाधिकृतपणे घड्याळाची विक्री करीता दुकानात घड्याळे बाळगतांना मिळुन आल्याने कारवाई करण्यात आलेली आहे..
🎯 इसम नामे- 1) मोहन प्रितमदास नागदेव, रा. सक्कर धर्मशाळाचे मागे, माताटोली, गोंदिया
2) श्यामलाल मोहनदास बजाज रा. सुरजमल बगीचा, सिंधी कॉलोनी, गोंदिया
यांचे दुकानातून बनावटी घड्याळे ज्यात – 1) टायटन कंपनीचे सोनाटा ब्रॉन्ड असे लिहलेली एकुण 119 मनगटी घडयाळे प्रत्येंकी 140/- रू प्रमाणे कि.16,660/- रू 2) टायटन कंपनीचे फास्ट ब्रेक ब्रॉन्ड असे लिहलेली एकुण 56 मनगटी घड्याळे प्रत्येकी 80/- रू प्रमाणे कि.4480/- रू किमंतीचे 3) टायटन कंपनीचे फास्टट्रक ब्रॉन्ड असे लिहलेली एकुण 02 चष्मा फ्रेम प्रत्येकी 40/- रू प्रमाणे कि.80/- रू किमंतीचे 4) टायटन कंपनीचे फास्ट ब्रक ब्रॉन्ड असे लिहलेली एकुण 05 घडयाळ डायल प्रत्येंकी 05/- रू प्रमाणे कि. 25/- रू किमंतीचे 5) टायटन कंपनीचे सिल्वहर बेल्ट असलेले एकुण 49 मनगटी घडयाळे प्रत्येकी 140/- रू प्रमाणे कि. 6860/-रू किमंतीचे 6) टायटन कंपनीचे फास्टट्रेक ब्रॉन्ड असे लिहलेली एकुण 02 मनगटी घडयाळे प्रत्येकी 140/- रू प्रमाणे कि. 280/- रू किमंतीचे असा एकूण 28,385/- रुपयांचा मुद्देमाल अनधिकृतपणे बाळगताना मिळून आल्याने हस्तगत करून जप्त करण्यात आले आहे..

इसम नामे- 1) मोहन प्रितमदास नागदेव, वय 27 वर्षे, रा. सक्कर धर्मशाळा चे मागे, माताटोली, गोंदिया
2) श्यामलाल मोहनदास बजाज, वय 54 वर्षे, रा. सुरजमल बगीचा, सिंधी कॉलोनी, गोंदिया
यांचे विरुध्द कॉपी राईट अधिनियम 1957 कलम 63, 65 व ट्रेड मार्क अॅक्ट 1999 चे कलम 103, 104 अन्वये पो. स्टे. गोंदिया शहर येथे गुन्हा क्र 747/,2023 अन्वये दाखल करण्यात आलेला आहे.......पुढील तपास पोउपनि... वानखेडे पो. स्टे. गोंदिया शहर करीत आहेत..
सदरची कारवाई मा. वरिष्ठांचे निर्देश सूचना प्रमाणे व मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री. दिनेश लबडे यांचे नेतृत्वात पो.स्टॉफ सपोनी विजय शिंदे,सागर गवसणे,पोहवा कोडापे, भेलावे, लुटे, गायधने, मपोशि तोंडरे, येरणे, पोना सोनवाने स्थानिक गुन्हे शाखा, व सायबर सेल, गोंदिया यांनी केलेली आहे.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com