गोंदिया शहर पोलीसांची मॉडीफाईड डी. जे. वाहनांवर धडक कारवाई..

उपसंपादक-रणजित मस्के

गोंदिया :- याबाबात थोड्क्यात माहिती अशी की, दिनांक 27/01/ 2024 रोजी मो. हजरत बाबा ताजउददीन यांचे जन्म दिवसानिमीत्त चादर/संदल कार्यक्रमात गोंदिया शहरात वेगवेगळया ठिकाणावरून जुलुस / रैली काढण्यात आली होती…. सदर जुलुस मध्ये जगदंबा धुमाल गृप ठाणा येथील डि.जे. वाहन क्रमांक एम एच 40 बी जी 2772 या मालवाहक वाहनावर परवाण्याशिवाय डि. जे. वाद्य बसवुन असुरक्षितपणे लोकांचे चढणे / उतरणे तसेच वाहनाचे बाहेर डि. जे. बॉक्स काढुन वाहतुक करतानी मिळुण आल्याने सदर वाहनावर कलम 108/177, 229 (2)/177, 198 मोटार वाहन कायदा अंतर्गत कारवाई करुन 2500/- रु. दंड आकारण्यात आले आहे.
तसेच के .जी.एन. धुमाल पार्टी राजनांदगाव वाहन क्रमांक सी.जी. 07 सी. ए. 1523 हे वाहन विना परवाना मॉडीफाईड करुन वाहनाचे बाहेर डि. जे.वाद्य व लाईटिंग लावुन मिळुण आल्याने मा. उप प्रादेशिक परीवहन अधिकारी गोंदिया यांना पत्र देवुन सदर डि. जे .वाहनावर दंड आकारण्याबाबत कळविले असता उप प्रादेशिक परीवहन अधिकारी, गोंदिया यांनी सदर वाहनावर 12500/- रु. दंड आकारले आहे…
सदरची कारवाई ही श्री. निखील पिंगळे, पोलीस अधीक्षक गोंदिया, श्री. नित्यानंद झा, अप्पर पोलीस अधीक्षक, गोंदिया, श्री. प्रमोद मडामे, उपविभागीय पोलीस अधिकारी, उपविभाग गोंदिया, यांचे निर्देशाप्रमाणे पोलीस स्टेशन गोंदिया शहरचे ठाणेदार, पोलीस निरीक्षक श्री. चंद्रकांत सुर्यवंशी यांचे मार्गदर्शनात सपोनि विजय गराड, पोउपनि शरद सैदाणे व पोलीस पथक यांनी केली आहे.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com