गोंदिया, भंडारा, नागपूर ग्रामीण, चंद्रपूर, गडचिरोली, आणि वर्धा जिल्ह्यांतील पोलीस खेळाडू संघात घेण्यात आलेल्या पोलीस क्रिडा स्पर्धा माहिती बाबत..

0
Spread the love

उपसंपादक-रणजित मस्के

गोंदिया :– मा. विशेष पोलीस महानिरीक्षक नागपूर परिक्षेत्र, नागपूर डॉ. श्री. दिलीप पाटील- भुजबळ (भा.पो.से.), मा. पोलीस उप-महानिरीक्षक, गडचिरोली परिक्षेत्र, कॅम्प नागपूर श्री .अंकित गोयल, यांचे निर्देश आदेशाप्रमाणे पोलीस अधीक्षक गोंदिया मा. श्री. गोरख भामरे, अप्पर पोलीस अधीक्षक श्री. नित्यानंद झा, यांचे मार्गदर्शनाखाली स्थापन क्रीडा स्पर्धा समितीतील वरीष्ठ अधिकारी यांचे प्रमुख उपस्थितीत व देखरेखीखाली आज दिनांक 11 डिसेंबर 2024 रोजी नागपूर परीक्षेत्रीय क्रीडा स्पर्धा सकाळी 06.30 वाजता पासून पोलीस मुख्यालय कारंजा गोंदिया, इंदिरा गांधी स्टेडियम, आणि क्रीडा संकुल गोंदिया येथील मैदानावर शुभारंभ करण्यात आला…… गोंदिया,भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर ग्रामीण, वर्धा अशा एकूण 6 जिल्ह्यांतील सहभागी संघामध्ये दिनांक 11-12-2024 ते 15-12-2024 या कालावधीत सांघिक व वैयक्तिक क्रिडा स्पर्धा घेण्यात येत आहेत..

आज दिनांक 11-12-2024 रोजी नागपुर परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धा – 2024 घेण्यात आलेल्या अॅथिलिटिक्स खेळ प्रकारातील अंतिम निकाल-


*खेळाचा प्रकार –
1) 5000 मीटर धावणे ( पुरुष)-

1) लिलाधर खरबनकर गडचिरोली (प्रथम)

2) विकाश चरले गडचिरोली (व्दितीय)

3) सत्यपाल घरत गोंदिया (तृतीय)

2) 5000 मीटर धावणे (महिला)-

1)डिम्पल खाडे चंद्रपुर (प्रथम)

2) वैष्णवी भोयर चंद्रपुर
(व्दितीय)

3) सोनिया लिल्हारे गोंदिया (तृतीय)

खेळाचा प्रकार लांब उडी (पुरुष)-

1) देवेन्द्र धुवारे गडचिरोली (प्रथम)

2) देवीदास पोटावी गडचिरोली (व्दितीय)

3) चंद्रकांत वाश वर्धा
(तृतीय)

खेळाचा प्रकार लांब उडी (महिला)-

1) अनिता शहारे गडचिरोली (प्रथम)

2) अंजली उसेंडी गडचिरोली (व्दितीय)

3) शितल आरके चंद्रपुर (तृतीय)

खेळाचा प्रकार गोळा फेक (पुरुष)-

1) लोमेश औरासे गडचिरोली (प्रथम)

2) अक्षय सयाम भंडारा (व्दितीय)

3) सचिन तेलंग गोंदिया (तृतीय)

खेळाचा प्रकार गोळा फेक (महिला) –

1) स्वरुपा नाइकवाडे गडचिरोली (प्रथम)

2) नेहा पठाण गडचिरोली (व्दितीय)

3) रोशनी गिवे चंद्रपुर (तृतीय)

त्याचप्रमाणे घेण्यात येणाऱ्या सांघिक व वैयक्तिक लीग (फेरी) खेळ प्रकारातील निकाल अंतिम सामने झाल्यानंतर दिनांक 15-12-2024 ला घोषीत करण्यात येणार आहेत..

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट