गोडाउनमधील सोयाबिन चोरी करणारी टोळी स्था.गुन्हे शाखा अमरावती ग्रामीण यांनी केली जेरबंद

सह संपादक -रणजित मस्के
अमरावती :
आरोपीचे नांव :-

१) मयुर प्रमोद कांचळे वय २६ वर्ष रा. धामणगाव रेल्वे
२) जितेंद्र जगदेव वानखडे वय २७ वर्ष रा. धामणगाव रेल्वे
३) निलेश अशोक शेंडे वय ३५ वर्ष रा. आसेगाव ता. धामणगाव रेल्वे
४) सचिन सदाशिव राउत वय ३६ वर्ष रा. धामणगाव रेल्वे
५) अमन व्यास रा. दत्तापुर
दि २३/०६/२५ रोजी पोलीस स्टेशन दत्तापुर जि. अमरावती येथे फिर्यादी गजानन रामदास राउत, तालुका क्षी अधिकारी, धामणगाव रेल्वे यांनी रिपोर्ट दिला की, दि २०/०६/२०२५ ते २२/०६/२५ रोजीचे मध्यरात्री दरम्यान शासकिय विश्राम गृह परिसरातील शासकिय गोडाउनचे अज्ञात आरोपीनी कुलुप कोडा तोडुन गोडाउनमधील सोयाबिनच्या २७ बंग (प्रति किलो २७) व तुर असा एकुण ८७०६०/-रु चा मुद्देमाल अज्ञात इसमांनी चोरुन नेल्यावरुन गुन्हा नोंद करण्यात आला होता.
मा.श्री. विशाल आनंद, पोलिस अधिक्षक अमरावती ग्रा.यांनी जिल्हयात अशा प्रकारच्या चोरीच्या घटनेला आळा बसावा याकरीता जिल्हयातील रेकॉर्डवरील गुन्हेगार यांचा शोध घेवुन जास्तीत जास्त गुन्हे उघडकिस आणने बाबत आदेशित केल्यावरुण पोलीस निरीक्षक किरण वानखडे, स्थानिक गुन्हे शाखा, अमरावती ग्रा यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक नेमुण आवश्यक सुचना दिल्या होत्या.
त्या अनुषंगाने गोडवून फोडून सोयाबीन धोरीच्या गुन्हयाचे समांतर तपासात स्था.गु.शा., अम.ग्रा. येथील पो.उप.नि. मुलचंद भांबुरकर व त्यांचे पथक हे चांदूर रेल्वे उपविभागात रेकॉर्डवरील आरोपी चेक करीत असतांना गोपनिय बातमीदारामार्फत खबर मिळालो की, सदरचा गुन्हा हा धामणगाव रेल्वे येथील राहणारा मयुर कांबळे व त्याचे साथीदार यांनी मिळून केला असल्याची गोपनिय माहिती मिळाली वरुन कॉटन मार्केट चौक, दत्तापुर येथुन मयुर कांबळे याला ताब्यात घेवून त्यास गुन्हयाचे अनुषंगाने विचारपुस केली असता त्याने त्याचे मित्र जितेंद्र वानखडे, निलेश शेंडे रा. आसेगाव, सचिन राउत, अमन व्यास दोन्ही रा. दत्तापुर सर्व रा. यानी मिळून गुन्हा केल्याची कबुली देवून सदर गुन्हयात चोरी गेलेल्या मालापैकी १ क्विटल २१ कि. अंदाजे कि. १०,८९०/रु चा माल व गुन्हयात वापरलेली होंडा शाईन मोटर सायकल कि.अं. ८०,०००/-रु असा एकुण ९०,८९०/-रु चा मुद्देमाल मयुर कांबळे याचे कडुन जप्त करण्यात आला. तसेच उर्वरित माल हा दत्तापुर येथे विक्रो केल्याचे सांगीतले. वरुन गुन्हयातील जप्त मुद्देमाल व आरोपी पुढील कार्यवाही करीता पो.स्टे. दत्तापुर यांचे ताब्यात देण्यात आने
सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. विशाल आनंद, मा. अपर पोलीस अधिक्षक श्री. पंकज कुमावत, अमरावती ग्रामीण, श्री. किरण वानखडे पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा यांचे मार्गदर्शनात पो.उप.नि. मुलचंद भांबुरकर, अमंलदार अमोल देशमुख, मंगेश लकडे, सचिन मसोंगे, दिनेश कनोजीया, चालक पो.की. प्रतीक वानखडे यांनी केली