गोदियात बनावट इंग्रजी दारू निर्मिती करणाऱ्या तिघांना रामनगर पोलीसानी घेतले ताब्यात

सह संपादक – रणजित मस्के
गोदिया

🕹️……याबाबत थोडक्यात माहिती अशी की, दिनांक 29 एप्रिल 2025 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस पथक पोलीस ठाणे गोंदिया शहर, रामनगर परिसराध्ये अवैध धंदे रेड, चोरी/ घरफोडीचे गुन्हेगार शोध, गुन्हे प्रतिबंधक पेट्रोलिंग करीत असताना पथकास गोपनीय बातमीदाराकडून खात्रीशीर बातमी मिळाली की भागवतटोला शेतशिवारामध्ये इसम नामे – धर्मेंद्र डहारे राहणार ढाकनी हा आपल्या ईतर साथीदारांचे मदतीने एका पकक्या बांधकाम असलेल्या घरात/ गोठ्यात बनावट इंग्रजी दारू निर्मिती करत आहे…..अशा मिळालेल्या खात्रीशीर खबरेबाबत वरिष्ठांना माहिती देऊन माननीय वरिष्ठांच्या निर्देश सूचना मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मिळालेल्या बातमीच्या ठिकाणी जाऊन रात्री 12.30 वाजता छापा टाकून कारवाई केली असता पोलीस आल्याची चाहूल लागताच काही इसम रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत पळून गेले तर तिघे इसम बनावट इंग्रजी दारू निर्मिती करीत असताना जाग्यावर मिळून आले.
मिळून आलेल्या तिन्ही इसमांना ताब्यात घेऊन बनावट इंग्रजी दारू निर्मिती ठिकाणची पाहणी करून बनावट इंग्रजी दारू निर्मिती करीता वापरते साहित्य स्पिरीट, खाली बॉटल, डुप्लिकेट लेबल, विविध रंगाचे चॉकलेटी फ्लेवर, 4 मोटर सायकल, प्लास्टिक कॅन, ड्रम, बनावटी इंग्रजी दारू, टिल्लू पंप, व दारू निर्मिती चे ईतर साहित्य* *असा एकुण किंमती 5 लक्ष 88 हजार 260/- रुपयांचा मुद्देमाल आरोपींचे ताब्यातून जप्त करण्यात आले. सविस्तर जप्तीची प्रक्रिया पंचनामा कारवाई करण्यात आली.
बनावट इंग्रजी दारू निर्मिती करणारे आरोपी नामे-
1) हंसराज सुखचंद मस्करे वय 49 वर्षे राहणार ढाकणी
2) जितेंद्र गोधनलाल नागपुरे वय 36 वर्षे राहणार- ढाकणी
3) गुलाब किसन वाढवे वय 40 वर्ष राहणार ओझीटोला तसेच
फरार पाहिजे आरोपी क्र. 4) धर्मेंद्र डहारे राहणार ढाकणी व इतर यांचेविरुद्ध पोलीस ठाणे रामनगर येथे महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 1949 कलम 65 अ, ब ,क ,ड, ई , 83, 108 सह कलम 123 भारतीय न्याय संहिता अन्वये सरतर्फे तक्रारदार – पोउपनि शरद सैदाने यांचे तक्रारी वरून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे…. पुढील कायदेशीर कारवाई प्रक्रिया रामनगर पोलीस करीत आहेत
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक गोंदिया श्री. गोरख भामरे, अप्पर पोलीस अधीक्षक श्री. नित्यानंद झा, यांचे निर्देश सूचनाप्रमाणे व उपविभागीय पोलीस अधिकारी उपविभाग गोंदिया श्रीमती रोहिणी बानकर, यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. दिनेश लबडे, यांचे नेतृत्वात सपोनी धीरज राजूरकर, पोउपनि शरद सैदाने, अंमलदार राजेंद्र मिश्रा, महेश मेहर, भुवन देशमुख, सुजित हलमारे प्रकाश गायधने , इंद्रजीत बिसेन, सुबोध बीसेन, दुर्गेश तिवारी, घनश्याम कुंभलवार, राम खंदारे लक्ष्मण बंजार यांनी केली आहे...