गोदिया शहरातील ३ व आमगाव येथील १ घरफोडीच्या गुन्हयाचा गोंदिया शहर पोलीसांनी केला उलगडा

0
WhatsApp Image 2025-06-27 at 8.41.51 PM
Spread the love

सह संपादक -रणजित मस्के

गोंदिया

            फिर्यादी श्री. अनंत विजयानंद शास्त्री , वय 45 वर्षे, रा. हरीओम कॉलोनी, विवेक मंदिर शाळेजवळ, गोंदिया हे त्यांचे काका ची प्रकृती खराब असल्याने त्यांना भेटायला दि. 02/06/2025 रोजी दुपारी 2.30 वा. घराचे मुख्य दाराला व गेटला कुलुप लावुन परिवारासह कर्नाटक येथे गेले होते. ते दि. 17/06/2025 रोजी पहाटे 3.00 वा सुमारास परिवारासह गोंदिया येथे घरी परत आले असता  घराचा मुख्य लाकडी दाराचे कडी कुंडा तुटलेला दिसला व दरवाजा अर्धवट खुला होता बेडरूममधील  दोन्ही आलमारी उघडी होती तेथील सामान व कपडे अस्त-व्यस्त पडलेले होते.  आलमारीची पाहणी केली असता त्यातील  चांदीचे  सिक्के किं. ७५००/-रु., चांदीची चैन लॉकेट सह किं.25000/-रु. व नगदी 2,20,000/-रु.असा एकुण 2,92,500/-रु. चा मुद्येमाल अज्ञात चोराने फिर्यादीच्या राहत्या घराच्या समोरील दाराचा कडी कुंडा तोडुन एकुण 2,92,500/- रु. चा मुद्येमाल चोरुन नेल्याचे फिर्यादीचे तक्रारीवरुन पो.स्टे. गोदिया शहर  येथे दि. 17/06/2025 रोजी अप.क्र. 441/2025 क. 305, 331(4), 3(5) भा.न्या.सं 2023 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता.  

सदर गुन्ह्याचा उघडकीस आणणेकरिता श्री. गोरख भामरे, पोलीस अधिक्षक, गोंदिया यांनी योग्य ते मार्गदर्शक सूचना गोंदिया शहर येथील पोलीस निरीक्षक श्री. किशोर पर्वते यांना दिले होते. पोलीस अधीक्षक यांनी दिलेल्या मार्गदर्शक सूचनाच्या अनुषंगाने पोलीस स्टेशन गोंदिया शहर येथील पोलीस निरीक्षक श्री. किशोर पर्वते यांनी गुन्हयाचे गांभीर्य लक्षात घेवून डी.बी. पथकासह घटनास्थळी भेट दिली व पथकास मार्गदर्शन करुन गुन्हयाचा त्वरीत उलगडा करण्याचे निर्देश दिले. त्याअनुषंगाने डी.बी. पथकातील अंमलदार यांनी गोपनिय माहितीच्या व फॉरेंसीक तज्ञांच्या मदतीने आरोपी नामे 1) अभिषेक ऊर्फ जादु प्रेमलाल वर्मा, वय 22 वर्षे, रा.माताटोली श्रीनगर गोंदिया, 2) लक्की विदेश कांबळे, वय 20 वर्षे, रा.सावराटोली गोंदिया यांना दि. 20/06/2025 रोजी आणि आरोपी क्र. 3) शुभम विक्की राऊत, वय 25 वर्षे रा. बालाघाट (म.प्र) ह.मु. सेलटॅक्स कॉलोनी फुलचुरपेठ गोंदिया यास दि. 22/06/2025 रोजी ताब्यात घेवून त्यांना अटक केली. अटक करुन त्यांचा पोलीस कोठडी रीमांड घेवून त्यांच्याकडे सखोल तपास करण्यात आला. आरोपी क्र. 1) अभिषेक ऊर्फ जादु प्रेमलाल वर्मा, वय 22 वर्षे, रा.माताटोली श्रीनगर गोंदिया याच्या ताब्यातुन गुन्हयातील चोरीस गेलेले नगदी 50,000/- रु., आरोपी क्र. 2) नामे लक्की विदेश कांबळे, वय 20 वर्षे, रा.सावराटोली गोंदिया याच्या ताब्यातुन नगदी 45,500/- रुपये आणि आरोपी क्र. 3) शुभम विक्की राऊत, वय 25 वर्षे रा. बालाघाट (म.प्र) ह.मु. सेलटॅक्स कॉलोनी फुलचुरपेठ गोंदिया याच्या ताब्यातुन गुन्हयातील नगदी 17,600/-रु., चांदीचे 6 नग मोठे सिक्के किं. 6,000/-रु, चांदीचा 1 नग छोटा सिक्का किं. 500/-रु, एक चांदीची चैन वजनी अंदाजे 50 ग्राम किं. 5000/-रु., गुन्हयाच्या रकमेमधुन घेतलेले एक वन प्लँस कंपनीचा निळ्या रंगाचा मोबाईल कि. 12,000/-रु., एक अँपल कंपनीचा 11 प्रो. ग्रे रंगाचा मोबाईल कि. 20,000/- रु. तसेच गुन्हयात वापरलेली ग्रे रंगाची नंबर नसलेली ज्युपीटर मोटार सायकल कि. 50,000/-रु. व गुन्हा करतांनी वापरण्यात आलेले लोखंडी पेचकस कि.अं. 50/-रु., लोखंडी सलाख कि.20/रु. असा 1,11,170/- रु. चा तसेच पो.स्टे. आमगाव हद्दीतील गुन्हयामधुन (अप.क्र. 405/25 क. 305(ब), 331(3), 331(4) भा.न्या.सं. मधील) चोरीस गेलेला 1) एक एच पी कंपनीचा लॅपटॉप कि.40,000/-रु., 2) दोन नग पिवळया धातुचे कडे किं.अं. 1500/-रु., 3) एक पिवळया धातुचा डोरला किं.अं. 2000/- रु., 4) एक पिवळया धातुची लहान बारीक चैन किं.अं. 4000/- रु., 5) एक पिवळया धातुचा ओम लिहीलेला लॉकेट किं.अं. 2000/- रु., तसेच कुंभारेनगर गोदिया येथील एका घरातुन चोरलेला 1) एक कोडॅक कंपनीचा कॅमेरा किं.अं. 2500/- रु., 2) एक सॅमसंग कंपनीचा मोबाईल किं.अं. 7000/-रु. व नगदी 2000/- रु. चा सुध्दा मुद्येमाल जप्त करण्यात आलेला आहे. अशा प्रकारे तिन्ही अटक आरोपीतांकडुन पो.स्टे. गोदिया शहर हद्दीतील तीन व आमगाव येथील एक घरफोडी उघड झालेली असुन एकुण 2,67,670/- रु. चा मुद्येमाल गोदिया शहर पोलीसांनी हस्तगत केलेला आहे. आमगाव येथील घरफोडीत पो.स्टे. गोदिया शहर अभिलेखावरील सराईत आरोपी नामे – मित्तल मुनेश्वर तुपटे, वय 20 वर्षे, रा. पैकनटोली गोंदिया याचासुध्दा सहभाग आहे.

सदरची कामगीरी श्री. गोरख भामरे, पोलीस अधिक्षक, गोंदिया, श्री. नित्यानंद झा, अपर पोलीस अधिक्षक गोंदिया, श्रीमती रोहीणी बानकर, उपविभागीय पोलीस अधिकारी गोंदिया यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन गोंदिया शहरचे पोलीस निरिक्षक श्री किशोर पर्वते, डी.बी. पथकाचे पो.हवा. कवलपालसिंग भाटीया, सुदेश टेम्भरे, निशिकांत लोंदासे, प्रमोद चव्हाण, सतीश शेंडे , दिपक राहांगडाले, पोशी दिनेश बिसेन, सुभाष सोनवाने, मुकेश रावते, अशोक राहांगडाले, प्रमोद शेंडे राकेश बंजारे, सोनु नागपुरे तसेच फॉरेंसीक तज्ञ सपोनि दुरसेलवार, पो.हवा. रितेश लिल्हारे, रवींद्र शहरे यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट