गिरणी कामगारांच्या संघटनेच्या मागण्यांना अखेर यश…गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड

प्रतिनिधी- भारती राणे

मुंबई: दिनांक 23 मार्च 2022 रोजी गिरणी कामगारानी मंत्रालयावर धडक मोर्चा काढला होता. तेव्हा दिलेल्या आश्वासन प्रमाणे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र अव्हाड यानी गिरणी कामगार कृती संघटनेच्या नेत्यां बरोबर त्यांच्या ए 3 या बंगल्यात बैठक घेतली,या बैठकीला कृती सामितिच्या नेत्यां बरोबर गृहनिर्माण प्रधान सचिव मिलिंद म्हैसकर, म्हाडा मुख्याधिकारी योगेश म्हसे, एम एम आर डी ए चे रेंटल हौसिन्ग चे मुख्य श्री मोहन सोनार व विध्या शेवाले.हे अधिकारी उपस्थित होते.
गिरणी कामगार कृती संघटनेच्या नेत्यानी पसंत केलेली ठाणे, अम्बरनाथ,कल्याण येथील 110 एकर जमिनी बाबत चर्चा होवून या जमिनीला महसूल खात्याने मंजुरी दिली आहे. आता या जमिनीला मे 2022 च्या महिन्याच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी घेउन ही जमीन गिरणी कामगारांच्या घरासाठी तातडीने उपलब्ध करुन देण्याची ठोस आश्वासन गृहनिर्माण मंत्री श्री. जितेंद्र अव्हाड यानी दिले.
त्यामुळे सर्व गिरणी कामगाराना घरे मिळण्याचा प्रश्न मार्गी लागला जाइल,तेव्हा गिरणी कामगार संघटनेच्या नेत्यानी समाधान व्यक्त केले.
पनवेल कोन गाव येथील 2417 घरांचा प्रश्न गेले कित्येक दिवस म्हाडा आणि एम एम आर डी ए यांच्यात घरांची दुरुस्ती कोणी करायची या वादात अडकून पडला होता आजच्या बैठकीत आव्हाड यानी म्हाडाला सांगितले की म्हाडानी ताबडतोब दुरुस्ती करवी आणि कामगाराना घराचा ताबा लवकरात लवकर द्यावा.दुरुस्ती खर्च अंदाजे 52 कोटि असणार आहे, त्याला एम एम आर डी ए ने सुध्दा मान्यता दिली त्या मुळे हा ही प्रश्न लवकरच सुटेल. जी पुढिल एम एम आर डी ए च्या घरांची सोडत काढणार आहेत त्या संबंधी काही तांत्रिक मुद्दे निर्माण झाले होते ते ही म्हाडा आणी एम एम आर डी ए ने जबाबदारी घेउन येत्या 10 ते 15 दिवसात 2500 घरांची सोडत काढण्याचा निर्णय घेण्यात आला.
बॉम्बेडाईंग व श्रीनिवास गिरण्यातील 4000 घरांची सोडत एक मार्च 2020 रोजी काढण्यात आली होती परंतू म्हाडाकडून घर वाटपाची प्रक्रिया आजुन सुरु झाली नाही या प्रश्नी म्हाडाचे सीईओ श्री योगेश म्हसे यानी महिन्यात ही प्रक्रिया सुरु होइल असे सांगितले.हे ठोस निर्णय जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्तीथीत घेण्यात आले.आणि या प्रश्नावर परत मिटींग घेण्याची वेळ मी येऊ देणार नाही असे आव्हाडानी ठोस पणे सांगितले.
या बैठकीला कामगार कृती संघटनेचे श्रीमती जयश्री खाडीलकर, प्रविण घाग, जयप्रकाश भिलारे,नंदू पारकर,प्रविण येरुणकर, हेमंत गोसावी, बबन गावडे.मोहन पोळ,निवृत्ती देसाई हे नेते उपस्थित होते.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
dipakbhogal@surakshapolicetimes.com