गर्लफ्रेंडला खुश करण्यासाठी चोरी करणारे फ्लिपकार्ड डिलीवरी बाॅईज पोलीसांच्या ताब्यात…

प्रतिनिधी-रणजित मस्के
बोरीवली : मुंबईतील एमएचबी पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीवरून त्यानी ३ डिलीवरी करणाऱ्या मुलाना ताब्यात घेतले आहे.

हे फ्लिप कार्ड डिलीवरी बाॅईज महागडे मोबाईल ऑर्डर कॅन्सल झाल्यानंतर ते कंपनीत परत करत होते.त्यानंतर कंपनीचा मॅनेजर
1) प्रणय धवल मोबाईलची चोरी करून आपला दुसरा साथीदार 2) सागर राजगोरला विकायला देत होता आणि त्यातुन मिळालेल्या पैशातून आपल्या गर्लफ्रेंडवर खर्च करत असत.
आश्चर्याची गोष्ट अशी की, फ्लिपकार्ड कंपनीच्या मॅनेजरनीच बोरीवली पश्चिम येथील एमएचबी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती की, फ्लिपकार्ड कंपनीच्या मोबाईलची ऑर्डर कॅन्सल झाल्यानंतर मोबाईल कंपनीला परत केला जातो परंतु त्याची चोरी होत असून आजपर्यंत एक डझन मोबाईल चोरी झाल्याची तक्रार दाखल होताच एमएचबी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. सुधीर कुराडकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण ऑफिसर सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. सुर्या पवार,पोलीस उपनिरीक्षक अखिलेश बोंबे, काॅनसटेबल अर्जुन अहिर आणि त्यांचे इतर साथीदार यांनी याबाबत अधिक तपास केला असता त्यांनी मोबाईल कॅन्सल झाल्याची वेळ आणि मोबाईल चोरी झाल्याची वेळ याची डिटेल्स काढल्यानंतर त्याना अशी माहीती मिळाली की, डिलीवरी बाॅईज हाच चोर आहे .
याबाबत सहायक पोलीस निरीक्षक श्री. सुर्या पवार यानी सीसीटीव्ही फुटेज आणि मोबाईल लोकेशनच्या माध्यमातून या ३ आरोपींची कसून चौकशी केल्यानंतर त्यांच्याकडून १५ महागडे मोबाईल रूपये ३,३१,२७२ ची मुद्देमाल हस्तगत केला आहे.
यामधील 1) सागर राजगोर ,2) भुषण गंगन आणि 3) प्रणय धवल या तीनही आरोपीस अटक केली असून त्यांच्याकडून अधिक तपास एमएचबी पोलीस करीत आहेत.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com