घरफोड्या करणाऱ्या आंतरराज्यीय सराईत गुन्हेगारास पुणे पोलीसानी केले जेरबंद…

सह संपादक- रणजित मस्के
पुणे ; साडे आठ तोळे सोन्याचे दागिने, ०२ किलो चांदीची भांडी, रोख रक्कम सह १६ लाख ५८ हजार रूपयांचा मुद्देमाल केला हस्तगत.स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीणची कारवाईदि. १३/०१/२०२५ रोजी पहाटेच्या वेळी भोर शहरात श्रीपतीनगरमध्ये रात्रीचे वेळी कुलुप बंद असलेल्या चार घरांमध्ये कोणीतरी अज्ञात चोरटयाने घराचे कुलूप कड़ी कोयंडा कशानेतरी उचकटून घरफोडी चोरी केली होती. सदर चोरीमध्ये अज्ञात चोरटयाने वेगवेगळ्या घरातील सोन्या-चांदीचे दागिने, रोख रक्कम असा एकूण २६,३५,८७४/- रू. चा मुद्देमाल चोरी करून नेला होता. सदर प्रकाराबाबत माधव दामोधर पुरोहीत वय ६४ वर्षे व्यवसाय सेवानिवृत्त, रा. श्रीपतीनगर, भोर ता. भोर जि. पुणे यांनी भोर पो स्टे गु.र.नं. १०/२०२५ भा.न्याय. सं. ३०५ (अ), ३३१ (२) (४) प्रमाणे फिर्याद नोंदविली आहे.भोर शहरातील मध्यवर्ती ठिकाणी एकाच वेळी चार कुलूप बंद असलेल्या घरांमध्ये घरफोडी चोरी करणेत आलेली होतो त्याचप्रमाणे सदर घटनेत मोठ्या प्रमाणात मुद्देमाल चोरी गेलेला होता. सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेत, मा. पोलीस अधीक्षक श्री. पंकज देशमुख, साो. पुणे ग्रामीण यांनी सदरचा गुन्हा उघडकीस आणण्याचे अनुषंगाने स्था. गु.शा. चे पथकास योग्य ते मार्गदर्शन करून सुचना केल्या होत्या. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांनी स्वतः तपासात सहभाग घेत एक पथक नेमण्यात आले होते. तपासादरम्यान घटनास्थळाकडे जाणारे येणारे सर्व रस्त्यांवरील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. सदर घटनेत एकच व्यक्ती असल्याचे निष्पन्न झाले. उपलब्ध झालेले सीसीटीव्ही फुटेज आधारे गुन्हा घडण्यापुर्वीचे सीसीटीव्ही फुटेज तपासणेत आले असता सदरचा व्यक्ती हा चोरी होण्यापूर्वी सहा ते सात तास अगोदर श्रीपतीनगर परिसरात येवून गेला असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे त्यानेच चोरी केल्याची खात्री झाल्याने सीसीटीव्ही फुटेज बातमीदारांकडून पडताळून घेतले असता, स्था.गु.शा.चे पथकाला गोपनीय बातमीदारा कडून बातमी मिळाली की, सदरची घरफोडी चोरी ही रेकॉर्डवरील गुन्हेगार नामे सचिन राजु माने रा. मंगळवेढा ता. मंगळवेढा जि. सोलापूर याने केली आहे. माहितीचे आधारे संशईत गुन्हेगाराचा शोध मंगळवेढा येथे घेण्यासाठी गेले असता, दि.२४/०१/२०२५ रोजी तो शिरवळ कडून पुण्याकडे जात असल्याची माहिती मिळाल्याने त्याचा पाठलाग करत त्यास पुणे-सातारा रोडवरील ससेवाडी परिसरात ताब्यात घेण्यात स्था.गु.शा.चे तपास पथकाला यश मिळाले. सदर आरोपीस नाव पत्ता विचारता त्याने त्याचे नाव लखन अशोक कुलकर्णी ऊर्फ सचिन राजू माने वय ३१ वर्षे रा. मंगळवेढा, ता. मंगळवेढा, जि. सोलापूर असे असल्याचे सांगितले. त्याचे मुळ आधार कार्डवरील नाव लखन अशोक कुलकणों असून गुन्हेगार क्षेत्रात तो सचिन राजू माने या नावाने ओळखला जातो अशी माहिती प्राप्त झाली आहे. गुन्हयाचे अनुषंगाने चौकशी करता त्याने गुन्हा केल्याचे सांगितले असून त्याने गुन्हा करणेसाठी हुंदाई इलैंट्रा कारचा वापर केला असून त्याचेकडून गुन्हयाचे तपासादरम्यान साडे आठ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने, दोन किलो ग्रॅम वजनाची चांदीची भांडी, रोख रक्कम, कार असा एकूण १६ लाख ५८ हजार रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करणेत आलेला आहे.आरोपी लखन अशोक कुलकर्णी ऊर्फ सचिन राजू माने वय ३१ वर्ष रा. मंगळवेढा, ता. मंगळवेढा, जि. सोलापूर हा घरफोडी चोरी करणारा सराईत गुन्हेगार असून त्याने गुजरात, कनार्टक, महाराष्ट्र राज्यात ठिकठिकाणी घर फोडी चोरी केलेली असून त्याचेवर सुमारे ५० पेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत. आरोपीने कर्नाटक राज्यात चोरी केल्यानंतर सात वर्षांची शिक्षा भोगलेली आहे.वातील फिर्यादी माधव पुरोहीत हे सेवानिवृत्त असून त्यांची आयुष्याची शिदोरीच गेल्यामुळे त्यांनी अतिशय हळहळ व्यक्त केली होती. सदरचा गुन्हा उघडकीस आल्याने त्यांचेसह श्रीपतीनगर मधील पिडीत कुटुंबांचे चेहऱ्यावर आनंद आला असून भोर शहरातील ग्रामस्थांकडून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाचे कौतुक करणेत येत आहे.सदरची कामगिरी मा. पोलीस अधीक्षक श्री. पंकज देशमुख, सो. पुणे ग्रामीण, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. गणेश बिरादार, बारामती विभाग, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री तानाजी बरडे, भोर विभाग, यांचे मार्गदर्शनाखाली, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, भोर पोस्टे चे पो नि आण्णासाहेब पवार, स्था.गु.शा.चे सपोनि दत्ताजीराव मोहिते, अंमलदार बाळासाहेब खडके, अमोल शेडगे, मंगेश भगत, महेश बनकर, मंगेश थिगळे, विजय कांचन, धिरज जाधव, अजित भुजबळ, काशिनाथ राजापुरे, केतन खांडे, अतुल मोरे यांनी केली असून आरोपीस मा. न्यायालयात हजर करून पोलीस कस्टडी रिमांड घेण्यात आलेली असून पुढील तपास भोर पो स्टे व स्था.गु.शा. चे वतीने करणेत येत आहे.