घरफोडीच्या गुन्ह्यातील आरोपी स्था. गुन्हे शाखा गोंदिया यानी केली अटक

0
Spread the love

सह संपादक -रणजित मस्के

गोंदिया : -HP कंपनीचा १ लॅपटॉप व ४ मोबाईल व इतर साहित्य एकूण किमती १,३१,७००/- रुपयांचा मुद्येमाल जप्त-

🔹.. याबाबत थोडक्यात हकिगत अशी की, तक्रारदार श्री. नंदलाल अनंतराम तुरकर वय ७० वर्ष रा. ऐकता कॉलनी सालेकसा जि गोंदिया व्यवसाय- माजी सैनिक असुन यांनी पोलीस ठाणे सालेकसा येथे तक्रार दिली कि दिनांक २५/५/२०२५ चे २१.३0 वा. ते दि. 2६/५/२०२५ चे ०८.00 वा. दरम्यान कोणीतरी अज्ञात चोरट्यानी त्यांचे सालेकसा येथे राहते घरातून एक एच.पी. कंपनीचा सिल्व्हर रंगाचा लॅपटॉप, ४ नग अँडराईड मोबाईल तसेच इतर साहित्य असा एकूण किंमती. 1,31,700/-रु. चा माल चोरून नेल्याचे फिर्यादी यांचे तक्रारीवरून पो. ठाणे सालेकसा येथे दिनांक- २६/0५/२०२५ रोजी अपराध क्र. २०४/२०२५ कलम ३०५(ए ) भारतीय न्याय संहिता नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता व आरोपीचा शोध सुरु होता


स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस पथक सदर गुन्ह्याचे समांतर तपास करीत असताना दिनांक १२/०६/२०२५ रोजी पथकास गोपनीय माहितगाराकडून माहिती मिळाली की, हर्ष कुजबिहारी हरिणखेडे रा. कटंगी गोरेगाव याने सालेकसा येथील मोबाईल व लॅपटॉप वर्गेैरेची चोरी केल्याची माहिती प्राप्त झाल्याने नामे- हर्ष हरिणखेडे रा. कटंगी गोरेगाव याचे शोध घेतले असता तो गावीच मिळून आला त्यास विश्वसात घेऊन विचारपूस केले असता त्याने सांगितले की, दिनांक 25/05/2025 रोजी फिर्यादीचे घरी पाहुना म्हणुन गेला होता रात्री सर्व लोक झोपल्या नंंतर रात्री 2.00 वा. दरम्याण लॅपटॉप व ४ मोबाईल व इतर साहित्य हे बॅग मघ्ये टाकुण बॅग सालेकसा येथे शेतशिवारात सुनसान जागी लपवुन ठेवला होता. त्यानंतर दिनांक 30/05/2025 रोजी दुपारच्या वेळेस सालेकसा येथे जाऊन वरील लपवुन ठेवलेले साहीत्य त्याचे स्वगावी कंटगी येथे स्वतःचे शेतात लपवुन ठेवला. वरील नमुद साहीत्य आरोपी हर्ष कुंजबिहारी हरिणखेडे वय 23 वर्ष रा. कटंगी (बु.) ता. गोरेगाव जिल्हा- गोंदिया यांनी चोरी केल्याचे सांगीतल्याने व गुन्हा केल्याचे कबुल केल्याने त्यांचे ताब्यातून खालीलप्रमाणे गुन्हयात चोरीस गेलेला मुद्देमाल जप्त करण्यात आला.
1)अंदाजे कि. 45,000/- रु एक एच.पी. कंपनीचा सिल्व्हर रंगाचा लॅपटॉप व चार्जर
2)अंदाजे कि. 16000/- रु एक नग सॅमांग कंपनीचा अँडराईड मोबाईल जामुनी रंगाचा
3) )अंदाजे कि. 30,000/- रु एक नग विवो कंपनीचा अँडराईड मोबाईल
4) )अंदाजे कि. 20,000/- रु एक नग नथींग सि.एम.एफ कंपनीचा अँडराईड मोबाईल
5) )अंदाजे कि. 15,000/- रु एक नग पोको एम-2 कंपनीचा अँडराईड मोबाईल
6) )अंदाजे कि. 2500/- रु एक नग स्मॉट वॉच नाईस कंपनीची
7) )अंदाजे कि. 1000/- रु एक जोड फायर बोल्ट कंपनीचे बडस
8) )अंदाजे कि. 1000/- रु एक नग बोट कंपनीचे नेक बेंड (हेड फोन)
9) )अंदाजे कि. 200/- रु एक नग माउस झेब्रानस कंपनीचे
10) )अंदाजे कि. 1000/- रु एक नग एच.पी. कंपनीचे काळया रंगाची लॅपटॉप बॅग असा एकूण किंमती. 1,31,700/-रु. चा मुद्देमाल हस्तगत करून गुन्ह्यात जप्त करण्यात आले आहे…आरोपींस पोलीस ठाणे सालेकसा पोलीसांचे स्वाधीन करण्यात आले असून पुढील कायदेशीर कारवाई प्रक्रिया सालेकसा पोलीस करीत आहेत..

🔹 सदरची कामगीरी पोलीस अधीक्षक गोंदिया, मा. श्री. गोरख भामरे, अपर पोलीस अधीक्षक गोंदिया श्री. नित्यानंद झा, यांचे निर्देश सूचनाप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम अहेरकर यांचे मार्गदर्शनात पोलीस पथक पोउपनि. शरद सैदाने, अंमलदार महेश मेहर, भुवनलाल देशमुख, दीक्षितकुमार दमाहे , विठ्ठल ठाकरे , सुबोध बिसेन, हंसराज भांडारकर, चापोशी राम खंदारे यांनी कारवाई केलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट