घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगारांस अटक करून ४,५५,०००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात पालघर पोलीसांना यश..!

0
Spread the love

बोईसर

उपसंपादक : मंगेश उईके

बोईसर पोलीस ठाणे हद्दीमध्ये दिनांक ०४/०७/२०२५ रोजी सायंकाळी ०४:१० ते ०६:०० वा. चे सुमारास तक्रारदार सौ. मंजुदेवी दिनेश पुरोहीत, वय ३१ वर्षे, व्यवसाय, गृहीणी, रा. सिध्दीविनायक सोसायटी, रुम नं. ००७ बोईसर ता. जि. पालघर, यांनी तक्रार दिली की, कोणीतरी अज्ञात चोरट्याने त्यांचे फ्लॅटच्या दरवाजाचे कडी व कोयंडा कशाने तरी तोडुन आतमध्ये प्रवेश करुन घरातील ४,६७,०००/- रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम असे घरफोडी चोरी करून नेले म्हणून बोईसर पोलीस ठाणे येथे गुन्हा रजि नं । २९०/२०२५ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०५ (अ), ३३१ (अ), ३१७ (२) प्रमाणे दिनांक ०५/०७/२०२५ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदरचा गुन्हा दाखल होताच पोलीस अधीक्षक, पालघर, श्री. यतिश देशमुख यांचे सुचनांप्रमाणे पोलीस निरीक्षक, श्री. शिरीष पवार, बोईसर पोलीस ठाणे यांनी तपास पथक तयार केले. सदर तपास पथकाने तांत्रीक विश्लेषणाच्या आधारे पोलीस ठाणे अभिलेखावरील हिस्ट्रीशिटर नामे धोनी ऊर्फ पाजी बच्चनसिंग सोडी, वय २२ वर्षे, रा. आझादनगर, बोईसर, ता.जि. पालघर यास अटक केली. त्याने तपासादरम्यान गुन्ह्यातील चोरीस गेलेले सोन्याचे दागिने आरोपीत कार्तीक राकेश मारु, वय-२२ वर्षे, रा. हनुमाननगर, नालासोपारा (पश्चिम), ता. वसई, जि. पालघर, याच्याकडे दिल्याची कबुली दिल्याने त्यास गुन्ह्याच्या तपासकामी अटक करुन प्रस्तुत गुन्ह्यात एकूण ४,५५,०००/- रुपये किंमतीचे ६५ ग्रॅम (६.५ तोळे) वजनाचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले.

यातील अटक आरोपीत धोनी ऊर्फ पाजी बच्चनसिंग सोडी हा पोलीस ठाणे अभिलेखावरील हिस्ट्रीशिटर असुन त्याच्या विरुध्द यापुर्वी बोईसर पोलीस ठाणे येथे ६ गुन्हे दाखल आहेत. तसेच आरोपीत नामे कार्तीक राकेश मारु याच्या विरुध्द आचोळे पोलीस ठाणे येथे ? गुन्हा दाखल आहे.

सदरची कारवाई ही श्री. यतिश देशमुख, पोलीस अधीक्षक, पालघर, श्री. विनायक नरळे, अपर पोलीस अधीक्षक, पालघर, श्री. विकास नाईक, उप विभागीय पोलीस अधिकारी, बोईसर विभाग यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री. शिरीष पवार, पो.उप.निरी/चंद्रकांत हाके, पो.उप.निरी/विठ्ठल मणिकेरी, पो.हवा./विजय दुबळा, पो.ना. / रमेश पालवे, पो.ना. योगेश गावित, पो.अंम./ मयुर पाटील, पो. अंम/देवेंद्र पाटील, पो. अंम/धिरज साळुंखे, पो. अंम/मच्छिंद्र घुगे, पो. अंम/गणेश व्हसकोटी व सायबर पोलीस ठाणे, पालघर येथील पो. अंम/जिग्नेश तांबेकर यांनी केलेली आहे. नमूद गुन्ह्याचा अधिक तपास हा पोउपनि/चंद्रकांत हाके, नेमणुक बोईसर पोलीस ठाणे हे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट