घरफोडीच्या सराईत गुन्हेगाराच्या गोंदिया स्थानिक गुन्हे शाखेने आवळल्या मुसक्या…

0
Spread the love

उपसंपादक-रणजित मस्के

गोंदिया:-

घरफोडीच्या सराईत गुन्हेगारास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक करुन एकूण 8 गुन्ह्यांची उकल, 8 गुन्ह्यातील किमती- 3 लाख, 42 हजार 600/- रुपयांचा सोन्या- चांदीचा मुद्देमाल हस्तगत करून उल्लेखनीय अशी कामगिरी केली आहे.

पोलीस अधीक्षक गोंदिया श्री.निखिल पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक श्री. अशोक बनकर, यांनी गोंदिया जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यास दाखल व अउघड चोरी घरफोडी, मोटार सायकल चोरी चे गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारांचा शोध घेवून, गुन्हेगारांना जेरबंद करून गुन्हे उघडकीस आणण्याच्या निर्देश सूचना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. दिनेश लबडे, यांना दिलेल्या होत्या.

  या अनुषंगाने माननीय वरिष्ठांच्या निर्देश सूचनाप्रमाणे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. दिनेश लबडे यांचे मार्गदर्शनात स्थानीक गुन्हे शाखेचे पोलीस पथक जिल्ह्यातील विविध पो.स्टे. ला दाखल असलेल्या चोरी, घरफोडी  मोटर सायकल चोरी करणाऱ्या गुन्हेगारांची माहिती काढून शोध घेण्यात येत होता.....आणि  स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातर्फे जिल्ह्यातील विविध दाखल गुन्ह्यांचा समांतर तपास, गुन्हेगारांची गुन्हे करण्याची पद्धतीबाबत तांत्रीक दृष्ट्या विश्लेषण करण्यात येवून गुन्हेगारांचा मागोवा घेण्यात येत होता...... विविध गुन्ह्याच्या तपासा दरम्यान गुप्त बातमीदार आणि तांत्रिक विश्लेषण माहिती वरुन सराईत गुन्हेगार नामे - प्रविण अशोक डेकाटे वय 28 वर्षे रा. तिलकवाडी मोहाडी,  जिल्हा भंडारा याने गोंदिया जिल्ह्यात बऱ्याच मोठ्या प्रमाणात चोऱ्या, घरफोड्या, केल्या असल्याची खात्रीशिर माहिती प्राप्त झाल्याने सदर गुन्हेगारांची संपुर्ण माहिती काढून त्याच्या प्रत्येक हालचालीवर नजर ठेवून दिनांक 3-11- 2023 रोजी गुप्त माहिती वरुन रेल्वे स्टेशन गोंदिया येथुन जेरबंद करण्यात आले...


 ➖  जेरबंद करण्यात आलेल्या नमूद सराईत गुन्हेगारास विश्वासात घेऊन गोंदिया जिल्ह्यातील चोरी, घरफोडी दाखल गुन्ह्याचे अनुषंगाने विचारपूस केली असता.... त्याने गोंदिया जिल्ह्यातील पोलीस ठाणें- केशोरी, नवेगावबांध, आमगाव हद्दित 08 ठिकाणी चोऱ्या घरफोड्या केल्याची कबुली दिली आहे.....

  ▪️नमूद सराईत गुन्हेगार यांनी आणखी जिल्ह्यात चोऱ्या, घरफोड्या केल्याची शक्यता आहे. आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता नाकारता येत नाही.. 

  🔹 उघडकीस आलेले गुन्हे खालील प्रमाणे ➖ 
  पो. स्टे.आमगाव➖ 

1)अप. क्र. 375/23 कलम 454, 380 भादंवि.
2)अप. क्र. 376/23 कलम 454, 380 भादंवि.
3)अप. क्र. 377/23 कलम 454, 380 भादंवि.
4)अप. क्र. 176/23 कलम 454, 380 भादंवि.
5)अप. क्र.378/23 कलम 454, 380,511 भादंवि.

 पो. स्टे.नवेगावबांध➖- 

6)अप. क्र. 101/23 कलम 380 भादंवि.
7)अप. क्र. 70/23 कलम 457, 380 भादंवि.

  पो. स्टे. केशोरी ➖

8) अप. क्र. 102/23 कलम 454, 380 भादंवि.

    🔹 वरील सर्व नमूद गुन्ह्यांतील एकूण हस्तगत मुद्देमाल➖ 60.05 ग्रॅम पिवळे धातू चे दागिणे, 30 ग्रॅम चांदी, रोख रक्कम 6 हजार रुपये, एक मोबाईल हँडसेट कि.4 हजार रुपये असा एकूण 3 लाख, 42 हजार 600/- रूपयांचा मुद्देमाल. हस्तगत करून पो.ठाणे आमगाव गुन्ह्यात सुपूर्द करण्यात आले आहे.

🎯 कामगिरी बजावणारे पथक-➖ 
        मा. श्री. निखिल पिंगळे, पोलीस अधीक्षक गोंदिया, श्री. अशोक बनकर , अपर पोलीस अधीक्षक, गोंदिया यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पो. नि.श्री. दिनेश लबडे, यांचे नेतृत्वातील पथक सपोनि - विजय शिंदे, पो.उप.नि. महेश विघ्ने, स. फौ. मधुकर कृपान, पो.हवा. विठ्ठल ठाकरे, चेतन पटले, तुलसीदास लूटे, इंद्रजित बिसेन, पो. शि. अजय रहांगडाले, चा.पो. हवा. लक्ष्मण बंजार, तसेच तांत्रीक शाखेचे- पो.हवा. धनंजय शेंडे, संजय मारवाडे, यांनी कामगिरी बजावलेली आहे.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट