घर फोडीचोरी करणारे २ अटल गुन्हेगार जेरबंद ४ गुन्हे उघडकीस, ४,६६,०००/-रु. किंमतीचा मुददेमाल हस्तगत..

0
Spread the love

सह संपादक – रणजित मस्के

पुणे

दिनांक १६/०३/२०२५ रोजी पहाटे ३/०० वा.चे सुमारास संतोषी माता मंदीर, तिरुपती कॉलनी येथे तक्रादार यांच्या राहत्या घरी चोरी झाले बाबत आंबेगाव पोलीस ठाणे गुरजि नंबर ४५/२०२५ बी.एन.एस.३०५ (अ), ३३१ (३), (४) प्रमाणे गुन्हा दाखल आहे. सदर गुन्हयांत आंबेगाव पोलीस ठाण्याचे तपास पथकातील पो. हवा हनमंत मासाळ व चेतन गोरे यांना मिळालेल्या गोपनिय बातमीच्या आधारे तपास पथाचे पो.उप.निरी कळमकर व टिमने इसम नामे १) आयुष संजय खरात वय २० वर्ष रा. सुखसागरनगर पुणे, २) आर्यन कैलास आगलावे वय १९ वर्ष रा. गोकुळनगर पुणे यांना यांना अटक करुन त्यांच्या कडुन खालील प्रमाणे गुन्हे उघकीस आले आहेत.

१. आंबेगाव पोलीस ठाणे गुन्हा रजिक्रमांक ४५/२०२५ बी. एन. एस. ३०५ (अ),३३१ (३), (४)

२. भारतीविदयापीठ पोलीस ठाणे गुन्हा रजिक्रमांक १९७/२०२५ बी. एन. एस. ३०५.३३१ (३) (४)

३. भारतीविदयापीठ पोलीस ठाणे गुन्हा रजिक्रमांक १०७५/२०२५ बी.एन.एस.३०३ (२)

४. मार्केडयार्ड पोलीस ठाणे गुन्हा रजिक्रमांक ६९/२०२५ बी.एन. एस ३०३(२)

सदर आरोपी कडुन २२ ग्रॅम सोन्याचे दागिने, ०४ लॅपटॉप, मोटार सायकल, रिक्षा असा एकुण ४,६६,०००/- रुपये किंमतीचा मुददेमाल जप्त केला आहे. यातील आरोपीत आर्यन आगलावे हा कोंढवा व मार्केटयाडे येथील घरफोडीच्या गुन्हयात पाहिजे आरोपी आहे. सदर गुन्हयाचा अधिक तपास आंबेगाव पोलीस स्टेशन तपास पथकाचे पो. उप. निरी मोहन कळमकर हे करत आहेत.

सदरची कारवाई मा.अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशीक विभाग पुणे (अतिरिक्त कारभार) श्री. मनोजकुमार पाटील, पोलीस उप आयुक्त परिमंडळ २ पुणे, श्रीमती स्मार्तना पाटील मा. सहा. पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग पुणे श्री. राहुल आवारे यांचे मार्गदर्शनाखाली आंबेगाव पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.शरद झिने, सहा. पो. निरी प्रियंका गोरे, पोलीस उप. निरीक्षक मोहन कळमकर, पोलीस अंमलदार शैलेंद्र साठे, हनमंत मासाळ, चेतन गोरे, निलेश जमदाडे, धनाजी धोत्रे, प्रमोद भोसले, सुभाष मोरे, नितीन कातुर्डे, योगेश जगदाळे, यांच्या पथकानेकेले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट