गावकऱ्यांची जुनी भांडी,दागिने नविन करुन देण्याच्या बहाण्याने फसवणूक करणाऱ्या सासु-सुनेला नेरळ पोलीसांनी केले जेरबंद…

रायगड : दिनांक 22 नोव्हेंबर 2021 रोजी कर्जत तालुक्यातील मोहाचीवाडी गावकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या त्या सासू सुनेला नेरळ पोलिसांकडून अटक करून न्यायालयाकडून एक वर्षाचा कारावास झालेला आहे.

गावोगावी फिरून जुनी भांडी नवीन भांडी करून देतो असे सांगून महिला नागरिकाकडून भांडी, सोने,चांदीचे दागिने घेऊन फरार झालेल्या त्या सासू सुनेला अखेर नेरळ पोलिसांनी देहूरोड पुणे येथून ताब्यात घेतलं.
नेरळ पोलिसांच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे सर्व स्थरातून कैतुक होत असून त्यां आरोपीना न्यायालयाने एक वर्षाचा कारावासाची शिक्षा देखील सुनावली आहे.
कर्जत तालुक्यातील नेरळ पोलीस ठाणे हद्दीत येत असलेल्या मोहाचीवाडी येथे 22 नोव्हेंबर 2021 रोजी फेरीवाल्यां या सासू सुनेने 20 हुन अधिक गोर गरीब महिलांना जुनी भांडी नवीन करून देतो असे सांगून फूस लावत त्यांच्याकडील भांडी, सोन्याचे व चांदीचे दागिने असा ऐकून 1लाख 50 हजाराहून अधिक रकमेचा ऐवज लंपास करून फरार झाल्या होत्या.
याबाबत नेरळ पोलीस ठाण्यात फसवणूक झालेल्या महिला वर्गानी तक्रार दाखल करताच नेरळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. संजय तेंडुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली एक टीम तयार करण्यात आली होती. CCTV व काही तांत्रिक बाबींच्या माहितीच्या आधारे सर्वप्रथम या टीमने या सासू सुनेचा शोध घेतला असता या वेगवेगळ्या ठिकाणी आढळवून येत होत्या. अखेर या सासू सुनेला देहूरोड पुणे येथून ताब्यात घेण्यात आले.
यातील सून सुलेखा नयासाल मल्हार ऊर्फ पूजा भांडीवाली तर सिमा श्यामसुंदर मल्हार ऊर्फ सिमा भांडीवाली असे या सासू सुनेचे नाव आहे.. तर त्या मुळच्या राहणाऱ्या मध्यप्रदेशच्या असून सध्या त्या शितलादेवी नगर देहू रोड पुणे येथे राहत होत्या. तर या महिलांच्या नावावर अन्य पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद असल्याची देखील माहिती समोर आली.
या आरोपी महिलांकडून गुन्ह्यात चोरी केले सर्व साहित्य नेरळ पोलिसांनी ताब्यात घेतले असून नेरळ पोलीस ठाण्यात वेगवेगळ्या कलमांतर्गत या महिलांवर गुन्हे नोदवण्यात आले आहेत. तर सदर गुन्हयासाठी न्यायालयाने दोषी ठरवुन त्यांना प्रत्येक गुन्हयात एक वर्षे सश्रम कारावास व १०००/- रु. दंड, तसेच दंड न भरल्यास ७ दिवस साधा कारावास अशी शिक्षा दिलेली आहे. नेरळ पोलिसांनी केलेल्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे त्यांचे सर्व स्थरातून कैतुक होत आहे
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
dipakbhogal@surakshapolicetimes.com